Indian Railway Jobs : रेल्वे विभागात 900 हून जास्त पदांसाठी नोकरीची संधी; पाहा काय आहे पात्रता

Indian Railway Jobs : रेल्वे विभागातील नोकऱ्यांना तर अनेकांचीच विशेष पसंती. काय सांगता तुम्हीही अशाच एखाद्या नोकरीच्या शोधात आहात का? मग ही माहिती तुमच्यासाठी...   

Jul 06, 2023, 09:32 AM IST

Sarkari Naukri : गेल्या काही वर्षांपासून सरकारी खात्यांमध्ये नोकरी करण्याकडे अनेकांचाच कल दिसून आला आहे. प्रशासकीय यंत्रणा असो किंवा शासनाच्या अख्त्यारित येणाऱ्या संस्था असो, तरुणाईचा कल सरकारी नोकरीच्या दिशेनं वाढतानाच दिसत आहे. 

1/7

Indian Railway Jobs

indian railway jobs south western railway recruitment news

Indian Railway Jobs : रेल्वे विभागात 900 हून जास्त पदांसाठी नोकरीची संधी; पाहा काय आहे पात्रता 

2/7

रेल्वेच्या वतीनं देण्यात आली एक जाहिरात

indian railway jobs south western railway recruitment news

​South Western Railway Recruitment 2023: रेल्वे विभागाच्या साऊथ वेस्टर्न रेल्वेच्या वतीनं नुकतीच एक जाहीरात जारी करण्यात आली आहे. ज्यानुसार दक्षिण पश्चिम मार्गावरील रेल्वे खात्यात अपरेंटिस / शिकाऊ पदासाठीचे अर्ज मागवण्यात आले आहेत.   

3/7

अधिकृत संकेतस्थळ

indian railway jobs south western railway recruitment news

इच्छुकांनी त्यांचे अर्ज आरआरसी हुबळीच्या  rrchubli.in या अधिकृत संकेतस्थळावरून पाठवावेत. या नोकरभरती प्रक्रियेसाठीची नोंदणी सुरु झाली आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 

4/7

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख

indian railway jobs south western railway recruitment news

तब्बल 904 पदांवरील भरतीसाठीच्या या नोकरीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 2 ऑगस्ट आहे. यामध्ये हुबळी डिविजनसाठी 237 पदं, कॅरिज रिपे्र वर्कशॉपसाठी 217 पदं, बंगळुरू डिविजनसाठी 230 पदं, म्हैसूर डिविजनसाठी 177 पदं, सेंट्रल वर्कशॉप म्हैसूरसाठी 43 पदं अशी पदांची विभागणी करण्यात आली आहे. 

5/7

वयोमर्यादा

indian railway jobs south western railway recruitment news

15 ते 24 वर्षे या वयोमर्यादेतील कोणीही व्यक्ती या नोकरीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे. ज्यासाठी इच्छुकांना इयत्ता दहावीच्या परीक्षेत मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुण असावेत शिवाय उमेदवार 12 वी (10 + 2) उत्तीर्ण असावेत. 

6/7

नोकरीसाठी अर्ज

indian railway jobs south western railway recruitment news

नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मेरिय लिस्टच्या आधारे करण्यात येईल. जिथं उमेदवारांना त्या ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप करायचीये त्यात किमान 50 टक्के + आयटीआयचे गुण अशा आधारे मेरिट यादी तयार करण्यात येईल.   

7/7

Application Fee

indian railway jobs south western railway recruitment news

अर्ज भरताना उमेदवारांना 100 रुपये Application Fee द्यावी लागणार आहे. ही फी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे.