IRCTC वरून रात्री 11.45 ते 12.30 पर्यंत तिकीट बुक का करता येत नाही?

अशा या Railway नं प्रवास करताना सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे तिकीट बुकींगचा... 

Jul 18, 2023, 12:29 PM IST

Indian Railway नं प्रवास करण्याची सवय असणाऱ्या अनेकांनाच रेल्वेकडून घेण्यात येणारे नवे निर्णय सहसा ठाऊक असातत. नवनवीन नियमावलीही या मंडळींच्या नजरेतून निसटत नाही. 

1/7

रेल्वे आरक्षण

IRCTC Ticket Booking Timing and other details

रेल्वेनं प्रवास करण्यासाठी तुम्ही जर एसी कोचमधून प्रवास करण्यासाठी आरक्षण अतिशय महत्त्वाचं असतं. त्यातही तुम्ही जर तत्काल तिकीट (Tatkal Ticket Booking) करताय, तर वेळ अंदाजात घ्यावीच लागते. 

2/7

तात्काळ तिकीट

IRCTC Ticket Booking Timing and other details

तात्काळ तिकीटीसाठी (Tatkal Ticket Booking) तुम्ही सकाळी 10 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत बुकिंग करू शकता. सर्वसामान्य तिकीट आरक्षणासाठी मात्र वेळेचे निर्बंध नसतात.   

3/7

रेल्वेचं संकेतस्थळ 24 तासांसाठी तुमच्या सेवेत

IRCTC Ticket Booking Timing and other details

रेल्वेचं संकेतस्थळ 24 तासांसाठी तुमच्या सेवेत असलं तरीही दिवसातून 45 मिनिटं मात्र तुम्ही त्या माध्यमातून तिकीट बुक करू शकत नाही. तुम्हाला माहितीये का, दररोज रात्री 11 वाजून 45 मिनिटांपासून 12.30 मिनिटांपर्यंत IRCTC च्या संकेतस्थळावरून तिकीट बुक करता येत नाही. 

4/7

11.45 पर्यंत तिकीट काढता येणार आहे

IRCTC Ticket Booking Timing and other details

यापूर्वी रेल्वे विभागाकडून फक्त 11.30 वाजेपर्यंतच तिकीट काढता येत होतं. पण, प्रवाशांना होणार असुविधा पाहता रेल्वेकडून तिकीट बुकिंगसाठीच्या वेळेत बदल केले आहेत. म्हणजेच आता प्रवाशांना 11.45 पर्यंत तिकीट काढता येणार आहे.   

5/7

सेवा बंद

IRCTC Ticket Booking Timing and other details

रात्री 11.45 ते 12.30 या वेळेत मात्र ही सेवा बंद असते. कारण, यादरम्यान रेल्वेकडून Server दुरुस्ती आणि देखभालीची कामं हाती घेतली जातात. परिणामी या वेळेत तिकीट बुकिंग, स्टेटस तपासणं, पीएनआर स्टेटस पाहणं या सेवा पूर्णपणे बंद असतात. 

6/7

डेटा ट्रान्सफर

IRCTC Ticket Booking Timing and other details

दर दिवशी रेल्वेच्या संकेतस्थळावरून जवळपास 8 लाख तिकीट बुक केले जातात. ज्यामुळं डेटा ट्रान्सफर संबंधीची कामंही याच वेळेत हाती घेण्यात येतात. तिकीटांची आणखी एक प्रत बनवली जाते. जेणेकरून माहितीला क्षती पोहोचल्यास इतर गोष्टी सुरक्षित राहतील. 

7/7

नवी माहितीसुद्धा पोर्टलवर अपडेट

IRCTC Ticket Booking Timing and other details

डेटा शिफ्टिंगच्या वेळी जर तुम्ही तिकीट बुक करत असाल तर, डेटाचं नुकसान होण्यासोबतच पैशांचा व्यवहार फसू शकतो. त्यामुळं रेल्वेकडून या 45 मिनिटांदरम्यान कोणतेही व्यवहार केले जात नाहीत. यादरम्यानच रेल्वे विभागाकडून नवी माहितीसुद्धा पोर्टलवर अपडेट केली जाते.