PHOTO : लेडीडॉनचं गँगस्टरशी शुभमंगल! हातात लग्नाची नव्हे, कायद्याची बेडी; बुलेट प्रूफ बँक्वेट हॉलमध्ये पार पडणार विवाहसोहळा

lady don Anuradha and Gangster Kala jathedi wedding ceremony :  दिल्लीतील या लग्नाची सर्व जोरदार चर्चा सुरु आहे. या आगळ्यावेगळ्या लग्नात पाहुणे कमी पोलीस जास्त असणार आहे. कारण हे लग्न आहे एका लेडीडॉनचं गँगस्टरशी. 

Mar 12, 2024, 10:36 AM IST
1/7

लेडीडॉन अनुराधा चौधरीचं गँगस्टर कला जाठेदीशी दिल्लीत लग्न होणार आहे. त्यासाठी तिहार तुरुंगात बंद असलेल्या कला 6 तासांचा कोठडी पॅरोल मिळाला आहे. जेलपासून जवळ असलेल्या द्वारकामध्ये तो लग्नासाठी येणार आणि विधी झाल्यानंतर तो परत तुरुंगात जाणार. 

2/7

अशा या गँगस्टर आणि लेडी डॉनच्या लग्नात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कंबर कसली आहे. या दोघांच्या शत्रूंची लिस्ट मोठी असल्याने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि क्राइम ब्रँचच्या पथकांव्यतिरिक्त 250 हून अधिक पोलीस आधुनिक शस्त्रांसह या लग्नात वावरणार आहे. 

3/7

काला जाठेदी आणि अनुराधा यांच्या लग्नासाठी पोलिसांशिवाय 150 पाहुणे असणार आहे. या पाहुण्यांवर सुरक्षा एजन्सीची नजर राहणार असून त्यांना लग्नाला उपस्थितीत लावण्यासाठी आय कार्डशिवाय आणि बारकोडशिवाय प्रवेश घेता येणार नाही. 

4/7

विशेष म्हणजे या आगळ्या वेगळ्या लग्नासाठी बँक्वेट हॉल पूर्णपणे बुलेट प्रुफ बनविण्यात आला आहे. त्यासाठी 2 मेटल डिटेक्टर बसवण्यात आलंय. मेटल डिटेक्टरमधून गेल्यानंतरच अतिथींना बँक्वेट हॉलमध्ये प्रवेश मिळणार नाही आहे. याशिवाय विवाह मंडपाच्या पार्किंगमध्ये पासशिवाय वाहनांना पार्किंग करता येणार नाही. 

5/7

या लग्नातील नवरदेवाचा लूकही वेगवेगळ्या असणार आहे. लग्न आहे म्हणून कला जथेडी याची हातकडी काढण्यात येणार नाही, असं स्पष्ट पोलिसांनी सांगितलं आहे. त्याशिवाय पोलिसांच्या घेऱ्यात या लग्नाचे विधी होणार आहे. 

6/7

या दोघांची प्रेम कहाणी देखील अजब आहे. हे दोघे अनेक प्रकरणांमध्ये फरार असताना त्यांची भेट मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये झाली. पहिली भेट, मैत्री आणि नंतर प्रेमात रुपांतर.  यानंतर दोघेही अनेक महिने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. मात्र जुलै 2021 मध्ये, दिल्ली पोलिसांनी कला जाठेदीला यूपीमधील सहारनपूरमधून गजाआड केलं. त्यानंतर त्याची रवानगी तिहार जेलमध्ये झाली.   

7/7

कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या माध्यमातून काला जाठेदी उर्फ संदीपशी ओळख झाल्याचं लेडी डॉनने सांगितलं. त्याशिवाय मुख्य प्रवाहात येण्यासाठी दिल्ली पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल अनुराधा चौधरीने त्यांचे आभार मानले आहे.