Loksabha Election : लोकसभेतील खासदारांचा हजेरीपट समोर; दांडी मारणारे कितीजण माहितीयेत?

Loksabha Election : सातत्यानं देशात सत्ता टिकवून असणाऱ्या मोदी सरकारच्या वतीनं येत्या काळात मतदारांना केंद्रस्थानी ठेवत सर्व निर्णय घेतले जात आहेत. या साऱ्यामध्ये लोकसभेतून एक आकडेवारी समोर आली आहे.   

Mar 12, 2024, 09:27 AM IST

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा देशातील नागरिकांच्या हाती मतदानाची ताकद पाहायला मिळणार आहे. लोकशाहीचा उत्सव म्हणून जगभरात भारतातील निवडणुकांची चर्चा असते. त्यातही यंदाची लोकसभा निवडणूक जास्तच खास आहे. 

 

1/7

जनतेचं प्रतिनिधीत्वं करणाऱ्या नेतेमंडळींचं काम

loksabha election 2024 mps attendance and other data latest updates

Loksabha Election : इथं निवडणुकीचा दिवस निश्चित नसला तरीही पुढच्या महिन्याभरात नेतेमंडळींचं भवितव्य निर्धारित होईलच असा कयास लावला जात आहे. असं असतानाच आता लोकसभेत नागरिकांचं प्रतिनिधीत्वं करणाऱ्या नेतेमंडळींचं काम पाहणंही तितकंच महत्त्वातं.   

2/7

खासदारांची हजेरी

loksabha election 2024 mps attendance and other data latest updates

जनतेचे प्रतिनिधी म्हणून ज्या खासदारांना आपण लोकसभेवर पाठवतो त्यांच्या दृष्टीनं लोकसभेतील उपस्थितीही महत्त्वाची भूमिका बजावते. याच धर्तीवर नुकतीच जून 2019 ते फेब्रुवारी 2024 दरम्यानची खासदारांची हजेरी समोर आली आहे.   

3/7

खासदारांनी किती प्रश्न विचारले?

loksabha election 2024 mps attendance and other data latest updates

लोकभेत दरम्यानच्या काळात पार पडलेल्या अधिवेशनामध्ये खासदारांची नेमकी उपस्थिती किती होती, कोणत्या राज्यातील खासदारांनी किती प्रश्न लोकसभेत उपस्थित केले असा सर्व आढावा पीआरएस लेजिस्लेटीव्ह रिसर्चमधून मिळाला आहे. 

4/7

दांड्या कोणी मारल्या?

loksabha election 2024 mps attendance and other data latest updates

हजेरीमध्ये 90 टक्क्यांहून अधिक हजेरी असणाऱ्या खासदारांची संख्या 146, 81-90 टक्के हजेर असणाऱ्यांची संख्या 149, 71 -80 टक्के हजेरी असणाऱ्या खासदारांची संख्या 91 तर, 61-70 टक्के हजेरी असणाऱ्या खासदारांची संख्या 71 इतकी आहे.   

5/7

सर्वात कमी हजेरी

loksabha election 2024 mps attendance and other data latest updates

51-60 टक्के हजेरीगटात 20, 41-50 टक्के हजेरी असणारे 14, 31-40 टक्के हजेरी असणारे 8, 21-30 टक्के हजेरी असणारे 5 आणि 20 टक्क्यांपर्यंत हजेरी असणारे 7 खासदार अशी नोंद आहे.   

6/7

प्रश्नांची सत्रं

loksabha election 2024 mps attendance and other data latest updates

लोकसभेत आतापर्यंत महाराष्ट्रातील खासदारांनी सर्वाधिक 16979 प्रश्न विचारले आहेत. त्यामागोमाग उत्तर प्रदेश (10377), तामिळनाडू (9891), आंध्र प्रदेश (6959), राजस्थान (5740), केरळ (5474), बिहार (5430), पश्चिम बंगाल (5391), कर्नाटक (5116), गुजरात (4780) या राज्यांची नावं येतात. 

7/7

कोणत्या पक्षानं विचारले सर्वाधिक प्रश्न

loksabha election 2024 mps attendance and other data latest updates

20149 ते 2024 दरम्यानच्या काळात लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या पक्षांमध्ये भाजप आघाडीवर असून, या पक्षानं 50437 इतके प्रश्न विचारले आहेत. तर, त्यामागोमाग काँग्रेचं नाव येत असून पक्षानं 11753 प्रश्न विचारले आहेत. पुढे या यादीत शिवसेना, द्रमुक, वायएसआर काँग्रेस, जदयू, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी, बीआरएसची ही नावं येतात.