'मी महिला असून मला स्तन आहेत, कॅमेरामन टॉप शॉट्स घेत असेल तर..'; अमृता संतापली

 Amruta Khanvilkar On Bodyshaming: कलाकार आणि सेलिब्रिटींना अनेकदा ट्रोल केलं जातं. मात्र याच ट्रोलिंगवरुन मराठमोळी अभिनेत्री अमृता खानलविलकर चांगलीच संतापली आहे. अमृताने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओवर एका मराठी महिलेने नोंदवलेल्या कमेंट्मुळे तिचा संताप झाला आहे. नेमकं घडलं काय आणि अमृताचं म्हणणं काय आहे पाहूयात...

| May 03, 2024, 13:32 PM IST
1/12

Amruta Khanvilkar On bodyshaming Slams trolls

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मराठीमध्ये एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून अमृताने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले होते.   

2/12

Amruta Khanvilkar On bodyshaming Slams trolls

ट्रोलर्स आणि त्यांच्या घाणेरड्या कमेंट्सवरुन अमृता चांगलीच खवळल्याचं पाहायला मिळालं. फेसबुकवरील पोस्टमधून अमृताने उघडपणे आपली नाराजी व्यक्त केलेली.   

3/12

Amruta Khanvilkar On bodyshaming Slams trolls

गुढीपाडव्याच्या दिवशी अमृताने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. "मी कोणाची तरी बहिणी, मुलगी, काकू, ताई, गर्लफ्रेण्ड, पत्नीही आहे. मी अभिनेत्री आहे कारण मी या क्षेत्रात काम करते. ट्रोलिंगच्या नावाखाली प्रेक्षक घाणेरड्या, अश्लील आणि लज्जास्पद गोष्टी बोलतात. हे फारच लाज आणणारं आहे. त्यांना त्यांच्या सीमा कळत नाहीत का?" असा सवाल अमृताने केला आहे.  

4/12

Amruta Khanvilkar On bodyshaming Slams trolls

एका मराठी महिलेने नोंदवलेली प्रतिक्रिया वाचल्यानंतर आपण संतापून ही पोस्ट लिहिली होती, असं अमृताने 'मिड डे'शी बोलताना सांगितलं. अमृताने मराठी प्रेक्षकच वाटेल तशी टीका करत असल्याबद्दल कठोर शब्दांमध्ये आक्षेप नोंदवला.

5/12

Amruta Khanvilkar On bodyshaming Slams trolls

"हे पाहा टीका करणं ही एक गोष्ट झाली. मात्र दिसण्यावरुन बोलणं म्हणजेच बॉडी शेमिंग करणं चुकीचं आहे. त्यातही हे मराठी प्रेक्षकांकडून होतंय," असं म्हणत अमृता संतापली.  

6/12

Amruta Khanvilkar On bodyshaming Slams trolls

"कदाचित मी अशापद्धतीने व्यक्त झाली नसते. मात्र एका मराठी बाईने अशी प्रतिक्रिया नोंदवली होती. म्हणजे मी साडीमधून ड्रेस शिवला काय किंवा ब्लाऊज शिवला काय, तो माझा प्रश्न आहे," असं अमृताने स्पष्टपणे सांगितलं.

7/12

Amruta Khanvilkar On bodyshaming Slams trolls

'हे चॅनेल्स सुद्धा या असल्या कंटेटवरील कमेंट्स बंद करत नाहीत कारण त्यामधून त्यांना व्ह्यूज मिळतात. मी स्वत: त्यांना फोन करुन कमेंट्स बंद करण्यास सांगितलं होतं,' असं अमृता म्हणाली.  

8/12

Amruta Khanvilkar On bodyshaming Slams trolls

"माझा मुद्दा असा आहे की, टीका करणं योग्य आहे. मात्र लोक शिव्या देतात. मात्र ते अशा शिव्या का देतात?" असा प्रश्न अमृताने विचारला.  

9/12

Amruta Khanvilkar On bodyshaming Slams trolls

"मी त्या व्हिडीओमध्ये पूर्ण अनारकली (ड्रेसचा प्रकार) परिधान केलेला आहे. जर कॅमेरामन टॉप शॉट्स घेत असेल तर तो माझा दोष नाही," असं अमृताने आपली बाजू मांडताना सांगितलं.  

10/12

Amruta Khanvilkar On bodyshaming Slams trolls

कॅमेरा अँगल्समुळे आपण ट्रोल होत असल्याचा मुद्दा अमृताने उपस्थित केला. "मी महिला आहे. मला स्तन आहेत. मी काय परिधान करावं आणि काय नाही हे कोण ठरवणार? हे फार विचित्र आहे," असं अमृता म्हणाली.

11/12

Amruta Khanvilkar On bodyshaming Slams trolls

"मला ठाऊक आहे की लोक तुमच्या शरीराबद्दल, त्वचेबद्दल, कपड्यांबद्दल बोलणार. इथपर्यंत सारं काही ठीक आहे. मात्र एक महिलाच जेव्हा असं करते ते फार विचित्र वाटतं," असं अमृताने म्हटलं.  

12/12

Amruta Khanvilkar On bodyshaming Slams trolls

"ते संस्कृतीबद्दल बोलतात आणि साडीमधून ड्रेस कसा तयार केला याबद्दल प्रतिक्रिया नोंदवतात. मात्र त्यांची संस्कृती अश्लील भाषा वापरण्याची असेल तर हे स्वीकारायचं कसं? मी पूर्णपणे याच्याविरोधात आहे. म्हणूनच मी संतापले," असं अमृताने सांगितलं.