कसा ओळखाल डेंग्यूचा ताप? अशा रुग्णांनी काय खावं-काय टाळावं; डॉक्टर काय सांगतात?
National Dengue Day 2024 : डेंग्यूचा ताप ऐकायला सामान्य वाटेल पण हा जीवघेणा आजार आहे. या आजाराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी 16 मे रोजी 'राष्ट्रीय डेंग्यू दिवस' साजरा केला जातो.
Dengue Symptoms in Marathi : सामान्य असा वाटणारा डेंग्यूचा ताप हा प्राणघातक रोग आहे. महत्त्वाचं म्हणजे डास चावल्याने डेंग्यूचा ताप येतो. या तापामुळे अनेकदा रुग्णाला आपला प्राण गमवावा लागतो. यामुळे डेंग्यू या बाबत जनजागृती करण्यासाठी 16 मे रोजी 'जागतिक डेंग्यू दिवस' साजरा केला जातो. अनेकदा रुग्णांना डेंग्यूचा ताप कसा ओळखावा हे कळतं नाही. तसेच या तापावर रुग्णांनी नेमकं काय खावं आणि काय टाळावं हे देखील समजून घेणे आवश्यक आहे. अशावेळी डॉ. अजय शाह यांनी दिलेली माहिती महत्त्वाची ठरते.