'पुरुष आणि महिला समान नाहीत...', नोरा फतेही असं का म्हणाली? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही सध्या 'मडगांव एक्सप्रेस' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या सगळ्यात नोराची एक मुलाखात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती प्रोफेशनल लाइफ आणि पर्सनल लाइफ विषयी स्पष्टपणे बोलताना दिसते.   

| Apr 15, 2024, 18:38 PM IST
1/7

नोरा फतेही

नोरानं ही मुलाखत BeerBiceps ला दिली होती. या मुलाखतीत नोरा स्त्रीवादीवर तिचे विचार मांडले आणि म्हणाली की ही गोष्ट आपल्या समाजाला खराब करते. तर या प्रकरणात नोरानं तिची प्रतिक्रिया दिली असून ती काय म्हणाली ते जाणून घेऊया. 

2/7

पुरुष आणि स्त्री हे समान नाही

"सामाजिक गोष्टींमध्ये पुरुष आणि स्त्री हे समान नाही. महिलांच्या हक्क आणि शिक्षणासाठी तिनं केलेल्या समर्थनाची पुष्टी केली. तिने कट्टरपंथी स्त्रीवादामुळे होणाऱ्या वाईट परिणामावर वक्तव्य केलं आहे." 

3/7

स्त्रीवाद कल्पनेवर विश्वास नाही

"मला कोणाची गरज नाही, स्त्रीवादीच्या कल्पनेवर किंवा या मूर्खपणावर माझा विश्वास नाही. खरं तर मला वाटतं की स्त्रीवाद हा आपला समाज उद्ध्वस्त करत आहे." 

4/7

स्त्री-पुरुषातील फरक

"नैसर्गिक रूपात पाहिलं तर पुरुषाला पुरवठादार, कमवूण आणणारा आणि स्त्रीला पालन पोषण करणारी मानलं जातं, परंतु आजच्या समाजात हे मानलं जात नाही. आजकाल, स्वतंत्र असणे म्हणजं लग्न न करणं आणि मुलं न होणे असे समजले जाते", असं नोरा म्हणाली.

5/7

पुढे नोरा म्हणाली, "हो, स्त्रीनं काम करायला हवं. आपल्या आयुष्यात हवं तसं जगायला हवं आणि स्वतंत्र्य रहायला हवं, पण एका मर्यादेपर्यंत. त्यांनी एक आई, एक पत्नी होण्यासाठी तयार रहायला हवं. तसंच जसं एक पुरुष कमवूण आणणारा, एक पती आणि वडील होण्यासाठी तयार असतो." 

6/7

तिच्या विचारांना पुरोगामी आणि पारंपारिक समजत असणाऱ्यांसाठी नोरा म्हणाली, "मात्र माझ्यासाठी हे समजून घेण्यासाठी एक नॉर्मल पद्धत आहे. फेमिनिजमनं पुरुषांचे ब्रेनवॉश केले आहे. नोराच्या या सगळ्या वक्तव्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे." 

7/7

नोराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती अनेक लोकप्रिय ठरलेल्या गाण्यांमध्ये दिसली. त्यात 'साकी साकी', 'दिलबर दिलबर', 'पछताओेगे', 'डांस मेरी रानी' आहेत.