Check Waiting Ticket Status: वेटिंग लिस्टचं तिकीट कन्फर्म झालं की नाही कसं पाहावं?

How to check waiting ticket status: प्रत्येक वेळी Confirm तिकीट मिळतेच असं नाही. मग अशा परिस्थितीत Waiting List वरील तिकिटावरच समाधान मानावं लागतं.   

Aug 24, 2023, 14:54 PM IST

How to check waiting ticket status: बऱ्याचदा शेवटच्या क्षणी रेल्वेप्रवास निश्चित होतो आणि त्यानंतर या प्रवासासाठी तिकीट काढण्याची लगबगही सुरु होते. 

1/8

How to check waiting ticket status

Waitinglist Tickets Indian Railways Check Waiting Ticket Status

How to check waiting ticket status:  वेटिंग लिस्टवरील तिकीट कन्फर्म होणं विविध निकषांवर आधारित असतं. पण, ही तिकीट कन्फर्म झाली आहे की नाही हे जाणून घेण्याचे अनेक मार्ग आहेत. 

2/8

PNR क्रमांक लिहून घ्या

Waitinglist Tickets Indian Railways Check Waiting Ticket Status

PNR क्रमांक म्हणजे जिथं प्रवाशाच्या नावाची नोंद असते. बुक केलेल्या प्रत्येक प्रवाशाला हा पीएनआर क्रमांक दिला जातो. तिकिटाच्या वरील बाजूस एका कोपऱ्यात किंवा IRCTC च्या संकेतस्थळावर तुम्हाला हा क्रमांक मिळतो. 

3/8

IRCTC चं संकेतस्थळ

Waitinglist Tickets Indian Railways Check Waiting Ticket Status

वेटिंग तिकिटीचा स्टेटस तपासण्यासाठी तुम्ही थेट IRCTC च्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. इथं तुम्ही ‘आयआरसीटीसी ट्रेन तिकीट बुकिंग’वर क्लिक करा. अॅपवरून स्टेटस पाहायचं झाल्यास ‘बुक तिकीट' पर्याय निवडा. 

4/8

सोपी पद्धत

Waitinglist Tickets Indian Railways Check Waiting Ticket Status

पीएनआर क्रमांक देताच तुम्हाला तिकीट स्टेटस दाखवला जाईल. तिकीट कन्फर्म झाली असल्यास तिथं तुम्हाला सीट क्रमांक/ बर्थ क्रमांक, कोच क्रमांक, बोर्डिंग स्टेशन दिसेल. असं नसल्यास तिथं WL असं स्पष्ट दिसेल. 

5/8

रेल्वे चार्ट

Waitinglist Tickets Indian Railways Check Waiting Ticket Status

अनेक प्रयत्नांनंतरही तुमची तिकीट कन्फर्म झाली नाही, तर मात्र तुम्हाला Railway Chart चीच वाट पाहावी लागेल. रेल्वेप्रवास सुरु होण्याआधीच हा चार्ट तयार केला जातो. रेल्वे स्थानकावरील Notice Board वर हा तक्ता लावला जातो. 

6/8

अंतिम टप्पा

Waitinglist Tickets Indian Railways Check Waiting Ticket Status

हा तोच टप्पा असतो जिथं तुम्हाला तिकीटाची मूळ स्थिती लक्षात येते. तिकीट कन्फर्म असल्यास त्याबाबतची सर्व माहिती तुम्हाला मिळेल. असं नसल्यास तुमचं नाव WL मध्ये दाखवलं जाईल. 

7/8

अजिबातच गोंधळून जाऊ नका

Waitinglist Tickets Indian Railways Check Waiting Ticket Status

WL च्या यादीत नाव असल्यास तुम्ही रेल्वेनं प्रवास करु शकता. पण, इथं तुम्हाला सामान्य बोगीतूनच प्रवास करावा लागेल. त्यामुळं पुढच्या वेळी वेटिंग लिस्टमध्ये आलेल्या तिकीटाचं स्टेटस तपासताना अजिबातच गोंधळून जाऊ नका.   

8/8

मदत कक्ष

Waitinglist Tickets Indian Railways Check Waiting Ticket Status

रेल्वे कायमच तुमच्या सेवेत असते. त्यामुळं तिकीटाबाबतही काही संभ्रम असल्यास तुम्ही अगदी सहजपणे मदत कक्षाकडे जाऊन शंकानिरसन करु शकता.