'या' देवीपुढे दाखवला जाणारा मद्याचा नैवेद्य भाविकांमध्ये वाटण्याची परंपरा, कुठंय हे मंदिर?

आपल्या देशात अनेक देव देवतांची मंदिरं आहेत. महाकाल नगरीत असे अनेक देव-देवता आहेत जे मद्याचं सेवन करतात. असं म्हणतात की, महाकालाला दररोज भांग अर्पण केलं जातं. 

| May 16, 2024, 14:02 PM IST
1/7

असंच महाकालच्या नगरात देवीचे एक मंदिर देखील आहे, जिथे नवरात्रीच्या महाअष्टमीच्या दिवशी जिल्हाधिकारी स्वतःच्या हाताने तिला मद्य अर्पण करतात. यानंतर, हा भोग पूजेचा भाग म्हणून सर्व देवी-देवतांना अर्पण केलं जातं. 

2/7

हे चोवीस खांब असलेले शहरातील सर्वात प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे. यामध्ये महालया आणि महामाया या दोन देवींच्या मूर्ती महाद्वाराच्या दोन्ही बाजूला स्थापित आहेत.

3/7

सम्राट विक्रमादित्यही या देवींची पूजा करत असत. हे मंदिर महाकालेश्वर मंदिराजवळ असून 12व्या शतकातील एक शिलालेख आहे.

4/7

या शिलालेखात असं लिहिलंय आहे की, अनहिलापाटणच्या राजाने अवंतिकामध्ये व्यापारासाठी नागर आणि चतुर्वेदी यांना याठिकाणी आणलं होतं आणि ते स्थायिक झाले.

5/7

यावेळी शहराच्या संरक्षणासाठी चोवीस खांब बसवले आहेत, म्हणून त्याला चोवीस खांबाचा दरवाजा म्हणतात.

6/7

प्राचीन काळी नवरात्रोत्सवाच्या अष्टमीला जहागीरदार, इष्टमुरार आणि जमीनदार यांच्याकडून पूजा केली जात असे. ही परंपरा आजही कायम आहे.

7/7

सम्राट विक्रमादित्य या देवींची पूजा करत असत. त्यांच्या काळापासून या ठिकाणी अष्टमी सणाला शासकीय पूजा करण्याची परंपरा चालत आली आहे. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेल्या गोष्टी माहितीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जातोय. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )