गॅस चोरी करताना टँकरचा भीषण स्फोट, चाकण-शिक्रापूर परिसर हादरला; नेमकं काय घडलं?

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण यात घरांची मोठी पडझड झाली. 

Updated: May 19, 2024, 09:34 AM IST
गॅस चोरी करताना टँकरचा भीषण स्फोट, चाकण-शिक्रापूर परिसर हादरला; नेमकं काय घडलं? title=

Chakan-Shikrapur Gas tanker blast : पुण्यातील चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट झाला आहे. चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा स्फोट झाला आहे. गॅसच्या टँकरमधून चोरी सुरु असताना एका पाठोपाठ एक भीषण स्फोट झाले. चाकण-शिक्रापूर मार्गावरील शेल पिंपळगावमध्येही मोठी दुर्घटना घडली. यामुळे एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण यात घरांची मोठी पडझड झाली. 

ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे पसार

पुण्यातील चाकण-शिक्रापूर मार्गावरील शेल पिंपळगाव या ठिकाणी पहाटे पावणे पाचच्या सुमारास गॅस चोरी करताना भीषण स्फोट झाला. गॅसच्या टँकरमधून चोरी सुरु असताना एकामागोमाग एक स्फोट झाले. चाकण-शिक्रापूर मार्गावरील शेल पिंपळगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली. एका हॉटेलकडून गॅसच्या टँकरमधून घरगुती आणि कमर्शिअल टाक्यांमध्ये गॅस चोरी करणं सुरु होतं, त्यावेळीच हा गॅसचा स्फोट झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे पसार झाले. 

वाहनांना मोठी आग

यावेळी झालेल्या स्फोटाने मोठी आग लागली होती. या आगीत हॉटेलसह तिथे उभ्या असलेल्या वाहनांना मोठी आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  पण आजूबाजूच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी लागलेली आग नियंत्रणात आणली. 

परिसरात भीतीचं वातावरण

यानंतर टँकरमधून गॅस गळती झाल्याने आग लागून हा स्फोट झाल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या या घटनेचा तपास चाकण पोलिसांकडून केला जात आहे. तसेच गेल्यावर्षीही अशीच धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली होती. त्यामुळे गॅस तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.