मंगळ गोचरने 'या' राशीच्या लोकांचे नशीब उजळणार ! 1 जुलैपर्यंत पैशाचा पाऊस

Mangal Gochar 2023: यावेळी मंगळचा अमंगळ होणार नाही. कारण 'मंगळ' कर्क राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे चांगला योग आला आहे. या योगामुळे तुमच्यावर पैशाचा वर्षावर होणार आहे. पुढील महिना तुमच्यासाठी खास असणार आहे.

Updated: Jun 9, 2023, 08:43 AM IST
मंगळ गोचरने 'या' राशीच्या लोकांचे नशीब उजळणार ! 1 जुलैपर्यंत पैशाचा पाऊस  title=
Mangal Gochar 2023

Mangal Gochar 2023: अनेक लोक मंगळ ग्रहाला घाबरत असतात. आपल्या कुंडलीत मंगळ योग असेल तर? या विचाराने घाबरुन जातात. मात्र, मंगळ, धैर्य, शौर्य आणि विवाहकारक मंगळ यावेळी काही राशींच्या लोकांना खूप काही देणार आहे. कर्क राशीतील मंगळाचे गोचर महत्त्वाचे मानले जात आहे. 1 जुलैपर्यंत या राशीच्या लोकांना भरपूर संपत्ती आणि यश देणार आहे. 

ग्रहांचा सेनापती म्हणून मंगळाला संबोधले जाते. तसे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे. मंगळ मिथुन राशीतून 10 मे रोजी दुपारी 1.48  वाजता कर्क राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ 1 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंतच कर्क राशीत प्रवेश करेल, त्यानंतर तो सिंह राशीत जाईल. कर्क राशीतील मंगळाच्या संक्रमणाचा सर्व 12 राशींच्या जीवनावर मोठा प्रभाव पडेल. या लोकांच्या आयुष्यात मोठे चढ-उतार पाहायला मिळतील. दुसरीकडे, काही राशींसाठी, हे शुभ संक्रमण शुभ परिणाम देईल. या लोकांना भरपूर पैसा आणि प्रगती मिळेल.  

मंगळ गोचरने या राशींच्या लोकांना लाभ

मेष -  मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. मंगळ गोचर मेष राशीच्या लोकांना लाभ देईल. या लोकांना कामात प्रगती होईल. जमीन-मालमत्तेशी संबंधित कोणतेही प्रकरण रखडली असतील तर ती मार्गी लागतील. आपल्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच तुम्हा रागावर नियंत्रण ठेवा आणि अहंकार टाळा. 

कर्क - मंगळाचा होणारा कर्क राशीत होणारा प्रवेश या राशीच्या लोकांना अनपेक्षित लाभ देईल. धनलाभ होईल. काही कामे भविष्यात फायदेशीर ठरतील.  सरकारी निविदा काढण्यात किंवा नवीन करार अंतिम करण्यात यश मिळेल. तुमच्या आरोग्याबाबत काळजी घ्या. जोडीदाराशी चांगले वागा.

कन्या - तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या, तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. कामे वेळेत पूर्ण होतील. नवविवाहितांना मुलांशी संबंधित सुखद माहिती मिळू शकेल. मंगळाचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देईल. परीक्षा-मुलाखतीत यश मिळेल. 

तुळ- या राशींच्या लोकांच्या हाती पैसा येईल. तूळ राशीच्या लोकांसाठी 1 जुलैपर्यंतचा काळ करिअरमध्ये फायदेशीर ठरेल. नोकरीच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळेल. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.  तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवीन करार होण्याची शक्यता आहे. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रश्न सुटतील. नवीन वाहन खरेदी करु शकता. 

मीन - मीन राशीच्या लोकांच्या उत्पन्नाचे साधन वाढेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. मंगळ शुभ परिणाम देईल. नोकरी-व्यवसायासाठी काळ चांगला राहील. कोणताही गाजावाजा न करता काम कराल तर तुम्ही अधिक यशस्वी व्हाल. कौटुंबीक जीवनात आनंद येईल. अपत्यप्राप्तीची शक्यता आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)