Ram Navami 2023 Shubh Muhurat : आज रामनवमी! यंदा अत्यंत दुर्मिळ योग, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त

Ram Navami 2023 Shubh Muhurat: आजची रामनवमी अतिशय विशेष आहे. कारण यंदा दुर्मिळ योग घडून आला आहे. अशी ही रामनवमी कधी आहे, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि शुभ योग, रामनवमीला पूजेचे उपाय एका क्लिकवर... (#JaiShreeRam)  

Updated: Mar 30, 2023, 01:07 AM IST
Ram Navami 2023 Shubh Muhurat : आज रामनवमी! यंदा अत्यंत दुर्मिळ योग, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त title=
ram navami 2023 date ram navami Panchang auspicious yoga puja muhurat upay and ayodhya ram navami in marathi

Ram Navami 2023 Shubh Muhurat: आजची रामनवमी खूप खास आहे. कारण हिंदू पंचांगानुसार यंदा रामनवमीला अतिशय दुर्मिळ योग जुळून येतं आहे. त्यामुळे राम भक्तांमध्ये रामनवमीसाठी उत्सुकता आहे.  राम मंदिरात या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अयोध्येमध्ये रामनवमीचा (ayodhya ram navami 2023) मोठा उत्साह पाहिला मिळतो. रामजन्मोत्सवाच्या दिवशी अयोध्येतील विविध मंदिरांमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम साजरे होणार आहेत.  (#JaiShreeRam)

राम नवमी 2023 शुभ मुहूर्त (Ram Navami 2023 Muhurat)

पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी 29 मार्च 2023 ला रात्री 9.07 वाजता सुरू झाली आहे. 30 मार्च 2023 ला रात्री 11.30 वाजता नवमी तिथी समाप्त होईल. म्हणजे 30 मार्चला राम नवमी साजरी केली जाणार आहे. 

पूजेचा मुहूर्त - सकाळी 11:17 - दुपारी 01:46 (कालावधी 02 तास 28 मिनिटे)
अभिजित मुहूर्त - 12.01 pm - 12.51 pm

राम नवमी 2023 शुभ योग (Ram Navami 2023 Shubh yoga)

रामनवमीला गुरु पुष्य योग, अमृत सिद्धी योग, रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि गुरु योग असे अतिशय दुर्मिळ योग जुळून आले आहेत. या पाच योगांमध्ये केलेली पूजा तुम्हाला फलदायी ठरणार आहे. या दिवशी केलेल्या सर्व कार्यात सिद्धी आणि यश प्राप्त होतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

  • गुरु पुष्य योग - 30 मार्च 2023, 10.59 - 31 मार्च 2023, सकाळी 06.13
  • अमृत ​​सिद्धी योग - 30 मार्च 2023, 10.59 - 31 मार्च 2023, 06.13
  • सर्वार्थ सिद्धी योग - दिवसभर
  • रवि योग - दिवसभर

गुरुवार - श्रीराम हा भगवान विष्णूचा 7वा अवतार असून गुरुवार हा विष्णूजींना अतिशय प्रिय आहे. अशा स्थितीत गुरुवारी रामजन्मोत्सव होत असल्याने त्याचं महत्त्व आणखी वाढलंय.

श्रीराम पूजा विधी आणि उपाय (Ram Navami 2023 puja and upay)

  • शुभ मुहूर्तावर भगवान श्रीरामांना केशरमिश्रित दुधाने अभिषेक करा.
  • त्यानंतर श्री राम चरित मानस पठण करा.
  • जर वेळेअभावी पाठ पूर्ण करता येत नसेल तर सुंदकंदचा पाठ करावा.  
  • असं केल्याने घरात सुख-समृद्धी आणि धन-समृद्धी वाढते.  
  • रामनवमीच्या दिवशी एका भांड्यात गंगाजल ठेवा आणि रामरक्षा मंत्र 'ॐ श्रीं ह्रीं क्लीं रामचन्द्राय श्रीं नम:' या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर हे पाणी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात छतावर शिंपडा. असं केल्याने घरातील वास्तुदोष नाहीसे होतात. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)