Shani Gochar : शनिच्या स्थितीबदलामुळे 'या' लोकांचं भाग्य सोन्यासारखं चमकणार, 2027 पर्यंत नशिबाची साथ

Shani Gochar : कर्मदाता शनिदेव सध्या स्वगृही कुंभ राशीत विराजमान असून मार्च 2025 पर्यंत तो या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर मीन राशीत गोचर केल्यानंतर 2027 पर्यंत चार राशी भाग्य सोन्यासारखं चमकणार आहे.

नेहा चौधरी | Updated: May 17, 2024, 11:07 AM IST
Shani Gochar : शनिच्या स्थितीबदलामुळे 'या' लोकांचं भाग्य सोन्यासारखं चमकणार, 2027 पर्यंत नशिबाची साथ  title=
Shani Nakshatra Gochar Due to Shani position change the fortune of these people will shine like gold they will get luck till 2027

Shani Rashi Parivartan 2025 in Meen Rash : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपल्या ठराविक वेळेनुसार एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. चंद्रदेव सर्वात जलद गतीने म्हणजे अडीच दिवसात आपलं स्थान बदलतो. तर शनिदेव सर्वात कमी गतीने आपली रास बदलतो. कर्मदाता किंवा न्यायदेवता शनिदेव एका राशीत अडीच वर्ष राहतो. सध्या शनिदेव स्वगृही कुंभ राशीत असून तो मार्च 2025 पर्यंत कुंभ राशीत विराजमान असणार आहे. त्यानंतर तो मीन राशीत गोचर करणार असून तिथे 2027 पर्यंत राहणार आहे. शनिदेवाच गोचर हे 12 राशींच्या लोकांवर परिणाम करतं. काहींसाठी हे भाग्यशाली तर काही लोकांसाठी ते संकटाचं ठरतं. शनिचं मीन राशीत प्रवेश चार राशींच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. यांच्यावर शनिदेवाची कृपा बरसणार असून यांचं भाग्य सोन्यासारखं चमकणार आहे. या लोकांना पूर्वीपेक्षा जास्त नफा मिळणार आहे. (Shani Gochar Due to Shani position change the fortune of these people will shine like gold they will get luck till 2027)

'या' राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार!

सिंह रास (Leo Zodiac) 

 

शनिदेवाच मीन राशीत प्रवेश हे सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना अनेक समस्यांनी वेढलंय त्यांची यातून मुक्तता होणार आहे. या लोकांना आर्थिक लाभाची संधी मिळणार आहे. तुमच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. काही तरी नवीन गोष्टी तुम्ही करणार आहात.  

मीन रास (Pisces Zodiac)  

शनिदेव मीन राशीत गोचर केल्यानंतर मीन राशीच्या लोकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. करिअर किंवा व्यवसायात तुम्ही प्रगती करणार असून पुढे जाण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. प्रत्येक कामात यश आणि कुटुंबासाठी आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. पैशांची बिलकुल कमतरता तुम्हाला या काळात भासणार नाही. 

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)   

मीन राशीत शनिदेवाच गोचर हे वरदान ठरणार आहे. 2025 ची वाट पाहा कारण तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. आर्थिक लाभ होणार असून बँक बॅलेन्स तगड होणार आहे. तुम्हाला नवीन आणि महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे. 

मकर रास (Capricorn Zodiac)   

मकर राशीच्या लोकांसाठी शनिदेवाच मीन राशीत प्रवेश सकारात्मक ठरणार आहे. समाजात तुमचा दर्जा वाढणार आहे. ज्या गोष्टी तुम्ही गमावल्या आहेत त्या तुम्हाला परत मिळणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)