Vipreet Rajyoga : शुक्रामुळे निर्माण झाला शक्तिशाली 'विपरित राजयोग'! 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Vipreet Rajyoga : शुक्रदेवाने स्वत:च्या राशीत शक्तिशाली असा विपरित राजयोग निर्माण केला आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Dec 8, 2023, 03:53 PM IST
Vipreet Rajyoga : शुक्रामुळे निर्माण झाला शक्तिशाली 'विपरित राजयोग'! 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस title=
shukra gochar 2023 or Venus creates a powerful Vipreet Rajyoga Rain of money will fall on these zodiac signs

Vipreet Rajyoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा धन, समृद्धी, सुख समृद्धी आणि प्रेम विवाहाचा कारक मानला जातो. गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या 30 तारखेला शुक्र देव दुर्बल राशीतून बाहेर येऊन स्वत:च्या राशीत म्हणजे तूळ राशीत गोचर केला आहे. पुढील 25 डिसेंबर 2023 पर्यंत शुक्र तूळ राशीत असणार आहे. शुक्र देवाच्या गोचरमुळे तूळ राशीत शक्तिशाली विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तेव्हा सहाव्या, आठव्या आणि बाराव्या घरातील स्वामी आपल्या राशीत प्रवेश करतो तेव्हा विपरित राजयोग निर्माण होतो. त्यानुसार तूळ राशीच्या आठव्या घराचा स्वामी शुक्र असल्याने हा योग तयार झाला आहे. हा अत्यंत शुभ योग मानला जात असून काही राशींना धनलाभ होणार आहे.  (shukra gochar 2023 or Venus creates a powerful Vipreet Rajyoga Rain of money will fall on these zodiac signs)

मेष रास 

या राशीच्या लोकांना विपरित राजयोगाचा फायदा होणार आहे. या राशीच्या सातव्या घरात शुक्र भ्रमण करत आहे. घर, लाइफ पार्टनर, लग्न आणि व्यवसायाशी संबंधित हे घर मानलं जातं. त्यामुळे विपरित राजयोग या लोकांना व्यवसायात मोठा नफा देणार आहे. या लोकांना मोठं यश आणि आर्थिक लाभ होणार आहे. अविवाहितांच्या आयुष्यात जोडीदाराची एन्ट्री होणार आहे. या काळात तुम्हाला कुटुंबाची साथ मिळणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत लाभणार आहे. बचत करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. 

वृश्चिक रास 

महाविपरीत राजयोग हा या राशीच्या बाराव्या घरात निर्माण झाला आहे. त्यामुळे या राशींसाठी विपरीत राजयोग फायदेशीर ठरणार आहे. या लोकांना परदेशातून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. शुक्रदेव धन, वैभव आणि ऐश्वर्य तुम्हाला देणार आहे. घरात सुख समृद्धी नांदणार आहे.  वाहन, दागिने आणि मालमत्ता याची खरेदी करण्याचे योग आहेत. व्यवसायिकांना नफा होणार आहे. परदेशातून तुम्हाला भरपूर नफा मिळणार आहे. कला कौशल्याला वाव मिळणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदच आनंद असणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालविणार आहात. 

मीन रास 

शुक्र या राशीच्या आठव्या घरात स्थिर आहे. त्यामुळे तुम्हाला दडलेल्या संपत्तीतून फायदा होणार आहे. विपरित राजयोग हा मीन राशीच्या लोकांना खूप अधिक फायदेशीर ठरणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून अचानक तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुम्हाला अचानक पैसे मिळणार आहे. फिल्म इंडस्ट्री, टीव्ही, मॉडेलिंग, मार्केटिंगशी संबंधित लोकांना खूप फायदा होणार आहे. तुमच्या कानावर आनंदाची बातमी पडणार आहे. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येणार आहे. मुलांचा प्रगतीने तुम्ही आनंदी असणार आहात. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)