Medicine Rate Reduced: भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी सरकारने काही आजारांवर कामी येणाऱ्या औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये केंद्र सरकारने 41 औषधं आणि 6 फॉर्म्युलेशनच्या किमतीत घट केली आहे. यानंतर शुगर, हृदय, यकृत, अँटासिड, संसर्ग, ऍलर्जी, मल्टीविटामिन, अँटीबायोटिक्सच्या किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे 41 औषधे स्वस्त होणार आहेत.
नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणजेच NPPA ची नुकतीच बैठक झाली. यावेळी NPPA च्या 143 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी यासाठी गॅझेट नोटीफिकेशन जारी करण्यात आली आहे. NPPA ही एक सरकारी नियामक संस्था आहे. ही संस्था भारतातील फार्मास्युटिकल औषधांच्या किमती नियंत्रित आणण्याचं काम करते. या संस्थेच्या निर्णयामुळे आता काही औषधांच्या किमतीत घट करण्यात आली आहे.
आजकाल औषधांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. साधारणपणे, संसर्ग आणि ऍलर्जी व्यतिरिक्त, या मल्टीविटामिन आणि एंटीबायोटीक्सच्या किंमती जास्त असतात. सामान्य व्यक्तींना ही औषधं परवडणारी नसतात. सामान्य उपचारांचा खर्च देखील जास्त असतो. त्यामुळे ही 41 औषधे स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
भारतात 10 कोटींहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. जगात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण असलेल्या देशांमध्येही भारत आघाडीच्या स्थानावर आहे. यावेळी देशातील अनेक रूग्ण यासंदर्भातील औषधं आणि इन्सुलिनवर अवलंबून आहेत. अशावेळी या रूग्णांसाठी औषधांमध्ये झालेली घट दिलासा देणारी असणार आहे.