विराट आणि सुरुचीसाठी १५ ऑगस्ट आहे आणखीनच स्पेशल

१५ ऑगस्ट... भारतभर स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय... हाच दिवस टीम इंडियाचा बॅटसमन विराट कोहली आणि टीव्ही अभिनेत्री सुरुची आडरकर यांच्यासाठी खास ठरलाय. 

Updated: Aug 15, 2017, 06:11 PM IST
विराट आणि सुरुचीसाठी १५ ऑगस्ट आहे आणखीनच स्पेशल title=

मुंबई : १५ ऑगस्ट... भारतभर स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय... हाच दिवस टीम इंडियाचा बॅटसमन विराट कोहली आणि टीव्ही अभिनेत्री सुरुची आडरकर यांच्यासाठी खास ठरलाय. 

विराट आणि सुरुचीसाठी हा दिवस स्पेशल ठरण्याचं कारण म्हणजे... आज या दोघांच्याही वडिलांचा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर दोघांनीही हा दिवस आपल्यासाठी खास का आहे हे सांगितलंय. 

आज टीम इंडियानं स्वातंत्र्य दिनानिमित्तानं कँडीमध्ये भारतीय झेंडा फडकावला आणि राष्ट्रगीतही गायलं. यावेळी कॅप्टन विराट कोहलीनं ध्वजारोहन केलं. यासाठी टीमचे हेड कोच रवि शास्त्रीयांच्यासहीत टीम इंडियाचे सारे खेळाडू आणि सपोर्टिंग स्टाफ हजर होता. यानंतर विराटनं सोशल मीडियावर आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दिल्लीतील आपल्या लहानपणीच्या आठवणी शेअर केल्यात. विराट केवळ १८ वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. 

तर दुसरीकडे मराठी मालिकांमधून घराघरांत दाखल झालेल्या सुरुचीनंही आपल्या वडिलांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्यात. माझं आयुष्य तुमच्याशिवाय विचारही करू शकत नाही, असं तिनं यावेळी म्हटलंय.