गुजरात टायटन्ससाठी आनंदाची बातमी! IPL 2024 मध्ये 'हा' दिग्गज खेळाडू करणार कमबॅक

IPL 2024 : आयपीएलचा 17 वा सिझन हा 22 मार्चपासून सुरू होणार आहे.  त्याआधी शुभमन गिलच्या गुजरात टायटन्ससाठी एक खूशखबरी मिळालेली आहे. आयपीएलमध्ये आपली जादू दाखवायला 'हा' दिग्गज खेळाडू सज्ज झालाय. 

Updated: Mar 12, 2024, 06:05 PM IST
गुजरात टायटन्ससाठी आनंदाची बातमी! IPL 2024 मध्ये 'हा' दिग्गज खेळाडू करणार कमबॅक title=

Gujarat Titans team update : गुजरात टायटन्सने या वर्षीच्या आयपीएलसाठी शुभमन गिलला आपला कॅप्टन नेमलेला आहे. मागील दोन वर्ष हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली असलेल्या गुजरात टायटन्सला हार्दिकने दोन्ही वर्षी आयपीएलच्या फायनलपर्यंत पोहोचवले होते, आणि आयपीएल 2022 मध्ये गुजरातला विजयीसुद्धा करून दिले होते. पण हार्दिक पांड्याला यावर्षी मुंबई इंडियन्सने ट्रेड केल्यामुळे शुभमन गिलच्या खांद्यावर गुजरातच्या कॅप्टन्सीचा भार आलेला आहे. पण आयपीएल सुरू होण्याआधी गुजरात टायटन्ससाठी एक खूशखबरी मिळालेली आहे. 2023 वर्ल्ड कपच्या वेळेस जखमी झालेला हा खेळाडू आता IPL च्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालेला आहे.

लवकरच हा खेळाडू गुजरातच्या जर्सीमध्ये दिसणार

वर्ल्ड कप 2023 मध्ये दुर्देवाने जखमी झालेला अफगानिस्‍तान आणि गुजरात टायटन्सचा धाकड स्पिनर राशिद खान मैदानात पुन्हा उतरण्यासाठी सज्ज झालेला आहे. आयरलंडविरूद्ध होणाऱ्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत तो खेळताना दिसू शकतो. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये राशिद खानला पाठीत दुखापत झाली होती, तेव्हापासून राशिद हा क्रिकेटपासून दूर होता. 

राशिद खानने आपल्या इंज्युरीवर अपडेट दिलेली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डशी संवाद साधताना राशिद खान बोलला की, 'माझी आता ट्रेनिंग चांगल्या पद्धतीने चालू आहे. मला विश्वास आहे की मी माझ्या देशाची जर्सी घालून लवकरच मैदानावर उतरणार, सर्जरीनंतर माझे मागील तीन महिने खूप कठिण गेलेले आहेत. मागील 7-8 महिन्यांपासून मी पाठीच्या दुखापतीपासून त्रस्त आहे. डॉक्टरने मला लगेच सर्जरी करायला लावली होती पण मी स्वत:च वर्ल्ड कप नंतर सर्जरी करणार असा निर्णय घेतला होता. कारण वर्ल्ड कप हा माझ्यासाठी खूप महत्वाचा इवेंट होता.' 

गुजरात टाइटंस IPL स्कॉड : 
शुभमन गिल, अजमतुल्लाह ओमरजई, उमेश यादव, सुशांत मिश्रा, शाहरुख खान, कार्तिक त्यागी, डेविड मिलर, मैथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, केन विलियमसन, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, जॉश लिटिल, रॉबिन मिन्ज, स्पेनसर जॉनसन, मानव सुतार और मोहित शर्मा