KL Rahul : मैदानावर उतरताच विराटने मला सांगितलं की...; कोहलीने दिलेल्या कानमंत्राचा राहुलकडून खुलासा

KL Rahul : 3 विकेट्स गेल्यानंतर विराट ( Virat Kohli ) आणि राहुलने ( KL Rahul ) 165 रन्सची पार्टनरशिप करत भारताला विजयाच्या वाटेवर आणलं. यावेळी के.एल राहुलने उत्तम 97 नाबाद रन्स केले. यावेळी सामना संपल्यानंतर के.एल राहुलने एक मोठा खुलासा केला आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 9, 2023, 09:09 AM IST
KL Rahul : मैदानावर उतरताच विराटने मला सांगितलं की...; कोहलीने दिलेल्या कानमंत्राचा राहुलकडून खुलासा title=

KL Rahul : टीम इंडियाने ( Team India ) वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी केली दिली आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने पराभव केला. भारताचा हा वर्ल्डकपच्या स्पर्धेतील पहिला सामना होता. विराट कोहली ( Virat Kohli ) आणि के.एल राहुल या विजयाचे खरे शिल्पकार ठरले आहेत. 3 विकेट्स गेल्यानंतर विराट ( Virat Kohli ) आणि राहुलने ( KL Rahul ) 165 रन्सची पार्टनरशिप करत भारताला विजयाच्या वाटेवर आणलं. यावेळी के.एल राहुलने उत्तम 97 नाबाद रन्स केले. यावेळी सामना संपल्यानंतर के.एल राहुलने एक मोठा खुलासा केला आहे. 

या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसाठी फारसा चांगला ठरला नाही. अवघ्या 200 रन्समध्ये कांगारूंची टीम पव्हेलियनमध्ये परतली होती. यानंतर टीम इंडियाला फलंदाजीसाठी आली असताना त्यांच्याही सुरुवात अत्यंत खराब झाली. 2 रन्सवर 3 विकेट्स गमावले असताना विराट ( Virat Kohli ) आणि के.एल राहुलने डाव सावरत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. दरम्यान यावेळी के.एल राहुल फलंदाजीला आला असता विराटने ( KL Rahul ) त्याला खास कानमंत्र दिला होता. 

के.एल राहुलचा विराटबाबत मोठा खुलासा

विराट कोहली ( Virat Kohli ) आणि केएल राहुलच्या 165 रन्सच्या पार्टनरशिपमुळे ऑस्ट्रेलियाच्या हातून सामना हिसकावून घेतला. रोहित शर्मा (0), इशान किशन (0) आणि श्रेयस अय्यर (0) यांच्या विकेट्स अवघ्या 2 रन्सच्या स्कोरवर गमावल्यानंतर टीम इंडिया अडचणीत आली होती. यानंतर केएल राहुलने टीम इंडियाला विजयाकडे नेल्यानंतर विराट सोबत क्रिझवर काय बोलणं झालं याचा खुलासा केला आहे. राहुल म्हणाला की, कोहलीने ( Virat Kohli ) त्यावा केवळ टेस्टप्रमाणे फलंदाजी करण्यास सांगितलं होतं. 

के.एल राहुल म्हणाला की, सुरुवातीला विराटशी ( Virat Kohli ) फारसं बोलणं झालं नाही. खरं तर मी नुकतीच आंघोळ केली होती आणि फिल्डींग केल्यानंतर अर्धा तास पाय विश्रांती देईन असा विचार मी केला होता. मात्र विकेट्स गेल्याने मला मैदानावर उतरावलं लागलं. यावेळी विराट म्हणाला की, मी काही वेळ टेस्ट क्रिकेटप्रमाणे खेळले पाहिजे. 

विजयानंतरही राहुलला 'या' गोष्टीचं दुःख

आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावल्यानंतर केएल राहुलच्या नावाची चर्चा रंगू लागली. त्यावेळी त्याच्या फिटनेस आणि फॉर्मवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र प्रत्येक सामन्यात त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. चेन्नईमध्ये विकेटकीपींग करून त्याने 97 रन्सची नाबाद खेळी खेळली. यावेळी त्याला शतक न केल्याची खंत आहे.

राहुल पुढे म्हणाला की, मला वाटतं की ही एक चांगली विकेट होती. मी शेवटचा शॉट चांगला मारला कारण मला फोर आणि सिक्स मारून शतक करायचे होतं. आशा आहे की मी येत्या काळात ही कामगिरी करेन.