Suryakumar Yadav: मी सामन्यापूर्वी सांगितलेलं की...; सिरीज जिंकल्यानंतर पाहा काय म्हणाला सूर्या?

Suryakumar Yadav: विजयासह टीम इंडियाने 5 सामन्यांची ही सिरीज देखील खिशात घातली आहे. या विजयासह टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव खूश दिसून येत होता. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 2, 2023, 07:14 AM IST
Suryakumar Yadav: मी सामन्यापूर्वी सांगितलेलं की...; सिरीज जिंकल्यानंतर पाहा काय म्हणाला सूर्या? title=

Suryakumar Yadav Statement: शुक्रवारी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथा टी-20 सामना रंगला होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 20 रन्सने पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने ( Team India ) 5 सामन्यांची ही सिरीज देखील खिशात घातली आहे. या विजयासह टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) खूश दिसून येत होता. 

सिरीज जिंकल्यानंतर काय म्हणाला सूर्या?

पाच सामन्यांच्या T20 सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav Statement ) म्हणाला, 'टॉस सोडला तर या सामन्यामध्ये सर्व काही आमच्या योजनेनुसार घडताना दिसलं. टीममधील खेळाडूंनी चांगलं कॅरेक्टर दाखवलं. मुख्य म्हणजे असं करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. मी सामन्यापूर्वी मीटिंगमध्ये सर्वांना सांगितलं होतं की, मैदानावर जा आणि मनात कोणतीही भीती न बाळगता शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने व्यक्त व्हा.

सूर्या ( Suryakumar Yadav ) पुढे म्हणाला की, मला नेहमीच अक्षर पटेलला दडपणाखाली ठेवायला आवडतं. अक्षरने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ती अविश्वसनीय होती. यावेळी डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर टाकल्यानंतर काय होतं हे पाहण्याचा आमचा प्लॅन होता.

अक्षर पटेलची उत्तम कामगिरी

या सामन्यात टीम इंडियाचा गोलंदाज अक्षर पटेलने ( Axar Patel ) चांगली कामगिरी केली. अक्षरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या T20 सामन्यात 4 ओव्हर्समध्ये 16 रन्स देत 3 बळी विकेट्स पटकावले. स्पिनच्या जोरावर टीम इंडियाने 20 रन्सने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत 3-1 अशी सिरीजमध्ये आघाडी घेतली आहे. 

टीम इंडियाने रचला इतिहास

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयासह टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विजय मिळवल्याचा रेकॉर्ड नावे केला आहे. भारताने 213 पैकी 136 सामने जिंकले आहेत. यावेळी टीम इंडियाने पाकिस्तानला मागे टाकलंय. पाकिस्तानने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 135 विजय मिळवले होते. आता भारताच्या विजयामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.