ICC World Cup 2023 India vs Australia Final : जगभरातील करोडो क्रिकेटप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते, तो क्षण आता जवळ येऊन ठेपलाय. येत्या रविवारी म्हणजे 19 नोव्हेंबरला क्रिकेटचा विश्वविजेता ठरणार आहे. आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia World Cup Final) आमने सामने असणार आहेत. अंतिम सामन्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. खेळपट्टीपासून सुरक्षेपर्यंतची जोरदार तयारी सुरु आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विराट कोहली, शुभमन गिल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह सारखे जबरदस्त फॉर्मात असलेले खेळाडू 2003 विश्वचषक पराभवाचा बदला घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत.
बीसीसीआयची करोडोची कमाई
विश्वचषकावर तिसऱ्यांदा नाव कोरण्यासाठी टीमइंडिया (Team India) सज्ज झालीय. टीम इंडियाने विश्वचषक जिंकल्यास भारतीय क्रिकेट बोर्डाची कोट्यवधी रुपयांची कमाई होणार आहे. आयसीसीने विश्वचषक जिंकणाऱ्या संघासाठी 40 लाख डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 33 कोटी 25 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे. भारतीय क्रिकेट संघावर बीसीसीआयचं नियंत्रण आहे. त्यामुळे आयसीसीच्या बक्षीसाची रक्कम आधी बीसीसीआयच्या खात्यात जाईल. त्यानंतर बीसीसीआयकडून बक्षीसाची रक्कम टीम इंडियाचे खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला वाटण्यात येतील. याशिवाय बीसीसीआय स्वत:कडूनही बोनस जाहीर करेल.
केवळ प्राईजमनीमधूनच बीसीसीआयची कमाई होणार नाही. तर यावेळी विश्वचषक स्पर्धा भारतात खेळवली जात आहे. त्यामुळे जाहीराती, प्रायोजक, तिकिटविक्री आणि डिजिटल राईट्समधूनही बीसीसीआयची कोट्यवधीत कमाई झालीय. टीम इंडिया फानयलला पोहोचल्याने या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
उपविजेत्या संघाला मिळणार इतके पैसे
आयसीसीने जाहीर केल्यानुसार विश्वचषक स्पर्धेत उपविजेत्या ठरणाऱ्या संघाला 20 लाख डॉलर म्हणजे 16.62 कोटी रुपये मिळणार आहेत. तर सेमीफायनलला हरणाऱ्या दोन्ही संघांना प्रत्येकी 6.65 रुपये प्राईजमनी दिला जाईल. ग्रुप स्टेजध्ये पराभूत झालेल्या प्रत्येक संघाला 83.12 लाख रुपये आि ग्रुप स्टेजमध्ये विजयी होणाऱ्या संघाला 33.25 लाख रुपये दिले जाणार आहे.
भारत-ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास
विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची सुरुवात पराभवाने झाली भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने सलग सात सामने जिंकत थेट सेमीफानयल गाठली आणि आता सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारलीय. तर टीम इंडियाने स्पर्धेत अपराजीत राहण्याचा पराक्रम केला आहे. टीम इंडियाने सर्व दहा सामने जिंकत फायनल गाठलीय.