IND W vs AUS W : पोरींनी मोडला ऑस्ट्रेलियाचा माज! 10 वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास

India vs Australia Womens Test Match : ऑस्ट्रेलियाचा 10 वर्षात पहिल्यांदा पराभव झाला अन् भारताने कांगारूंचा माज मोडला आहे. टीम इंडिया गोलंदाज स्नेहा राणा (Sneh Rana) हिला प्लेयर ऑफ द मॅचचा जाहीर करण्यात आलंय. 

सौरभ तळेकर | Updated: Dec 24, 2023, 02:51 PM IST
IND W vs AUS W : पोरींनी मोडला ऑस्ट्रेलियाचा माज! 10 वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास title=
IND W Vs AUS W Test

IND W Vs AUS W Highlights : मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या महिला संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव केला आहे. दुसऱ्या डावात (IND W vs AUS W) टीम इंडियासमोर माफक 75 धावांचं आव्हान होतं. भारताच्या महिला ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाचं काम फत्ते केलं. या सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियाचा 10 वर्षात पहिल्यांदा पराभव झाला अन् भारताने कांगारूंचा माज मोडला आहे. टीम इंडिया गोलंदाज स्नेहा राणा (Sneh Rana) हिला प्लेयर ऑफ द मॅचचा जाहीर करण्यात आलंय.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 धावांना प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्या डावात 406 धावा केल्या आणि 187 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन मिळाल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची कंबर मोडली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 261 धावा उभारल्या होत्या. त्यामुळे भारताचा विजय सोप्पा झाला होता. भारताच्या एकूण 406 धावा ही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. दीप्ती आणि वस्त्राकर यांच्यात आठव्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी देखील भारतासाठी एक विक्रम आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात पूजा वस्त्राकर हिने 4 विकेट्स घेतल्या तर स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 3 आणि 2 विकेट्स काढल्या. त्यानंतर भारताच्या फलंदाजी दरम्यान स्मृती मानधनाने 74 धावांची अफलातून खेळी केली. तर जेमिमाह रॉड्रिग्स हिने 73 धावा तर दीप्ती शर्माने 78 धावांचं उल्लेखनिय योगदान दिलं. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात स्नेहा राणाने पुन्हा 4 विकेट्स खोलल्या अन् कांगारूंना बॅकफूटवर पाठवलं. त्यातचबरोबर हरमनप्रीत कौरने 2 महत्त्वाच्या विकेट्स काढल्या. भारताच्या दुसऱ्या डावात स्मृती मानधनाने 38 धावांची विनिंग खेळी केली

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (डब्ल्यू), रिचा घोष, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, राजेश्वरी गायकवाड.

ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मूनी, फोईब लिचफील्ड, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, एलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), एनाबेल सुथरलँड, एशले गार्डनर, जेस जोनासेन, एलाना किंग, किम गर्थ, लॉरेन चीटल.