IPL 2021 : आऊट झाल्याने Virat Kohli ला राग अनावर

आऊट झाल्यानंतर विराटने खुर्चीवर असा काढला राग

Updated: Apr 14, 2021, 10:29 PM IST
IPL 2021 : आऊट झाल्याने Virat Kohli ला राग अनावर title=

चेन्नई : सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (SRH vs RCB) दरम्यान झालेल्या आयपीएल 2021 मधील सहाव्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) चांगलाच संतापला. विकेट गेल्यानंतर बाहेर पडताना त्याला राग अनावर झाला. (Virat Kohli Angry)

खुर्चीवर काढला राग

विराट कोहली आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. चेन्नईच्या मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार पुन्हा एकदा आक्रमक दिसला. विकेट गमावल्यानंतर जेव्हा तो डगआऊटला पोहोचला तेव्हा त्याने त्याचा राग खुर्चीवर काढला.

जेसन होल्डरने विराटला केलं आऊट

या सामन्यात विराट कोहलीने 29 बॉलमध्ये 33 धावा केल्या. या दरम्यान त्याने 4 चौकार ठोकले पण जेसन होल्डरच्या बॉलिंगवर विजय शंकरने कॅच घेत त्याला आऊट केले. आऊट झाल्यामुळे विराटला राग अनावर झाला.