'द रन मशीन' विराट कोहलीची बॅट का शांत? धावा न निघण्यामागचं कारण समोर

टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वीच कोहलीच्या फ्लॉप शोमागचं कारण सांगितलं होतं.

Updated: Apr 24, 2022, 08:59 AM IST
'द रन मशीन' विराट कोहलीची बॅट का शांत? धावा न निघण्यामागचं कारण समोर title=
मुंबई : विराट कोहलीचे फॅन्स जगभरात आहेत. त्याची फलंदाजी पाहून त्याच्या प्रेमात पडणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहलीची बॅट खूप शांत आहे. यंदा आयपीएलच्या हंगामातही त्याच्या बॅटची कमाल पाहण्याचा क्षण आला नाही. कोहलीला खेळताना पुन्हा एकदा पाहायचं आहे. मात्र प्रत्येकवेळी निराशाच हाती येत असल्याचं दिसत आहे. 
 
विराट कोहलीनं टी 20 वर्ल्ड कपनंतर एकामागे एक तिन्ही क्रिकेटच्या फॉरमॅटचं नेतृत्व सोडलं. आयपीएलमध्ये देखील बंगळुरूचं कर्णधारपद सोडून फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतरही कोहलीला म्हणावं तेवढं फलंदाजीमध्ये यश मिळालं नाही. यामागे नेमकं काय कारण असेल यावर सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. 
 
दुसरीकडे विराट कोहली सतत क्रिकेटप्रेमींची निराशा करत असल्याने त्याला आणि अनुष्काला ट्रोल देखील केलं जातं आहे. मात्र कोहलीची बॅट शांत राहण्यामागे एक धक्कादायक कारण समोर आलं आहे. कोहलीच्या फ्लॉप शोवर आरसीबीच्या कोचकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. 
 
बंगळुरूचे प्रमुख संजय बांगर विराट कोहलीच्या बचावासाठी उतरले. कोहली जेवढं शक्य आहे तेवढं सगळं करतोय मात्र असा एक टप्पा असाही येतोच त्यामुळे कोहली या टप्प्यातून देखील नक्की बाहेर पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 
 
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोहली एका मॅचमध्ये एक रन काढून आऊट तर दोन मॅचमध्ये गोल्डन डक झाला. बांगर पुढे म्हणाले की कोहली असा एकमेव खेळाडू आहे ज्याने यापूर्वी बंगळुरूसाठी खूप चांगली कामगिरी केली आहे.
 
रवी शास्त्रीने सांगितली ही मोठी गोष्ट
 
टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वीच कोहलीच्या फ्लॉप शोमागचं कारण सांगितलं होतं. कोहलीला खूप जास्त थकवा आला आहे. हा थकवा त्याच्या शरीरासाठी आणि मॅचमधील कामगिरीच्या दृष्टीनं वाईट आहे. त्याला विश्रांतीची जास्त गरज आहे. 
 
याबाबत बांगर यांना यासंदर्भात विचारल्यावर त्यांनी याकडे फारसे लक्ष दिलं नाही. तो निश्चितपणे सर्व काही करतो जे त्याच्या नियंत्रणाखाली आहे. तो त्याच्या तंदुरुस्ती आणि कौशल्यावर काम करत आहे आणि चांगली विश्रांती घेत आहे. तो त्याच्यावर दबाव येऊ देत नाही, तो नियमित अंतराने विश्रांती घेत आहे आणि तो पुढेही करत राहील.