IPL 2024 : रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ; वसिम अक्रम म्हणतो, हिटमॅन 'या' संघाकडून खेळणार

Wasim Akram On Rohit Sharma : रोहित शर्माने पुढील वर्षी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai indian) नाही तर केकेआरकडून (KKR) खेळावं, अशी वसीम अक्रमची इच्छा आहे.

सौरभ तळेकर | Updated: May 9, 2024, 03:42 PM IST
IPL 2024 : रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ; वसिम अक्रम म्हणतो, हिटमॅन 'या' संघाकडून खेळणार title=
Wasim Akram Said Rohit Sharma Will Leave Mumbai indians

Rohit Sharma Will Leave Mumbai indians : आयपीएलमधील जोरदार लढतीनंतर आता प्लेऑफसाठी (IPL 2024 Playoffs) कडवी टक्कर पहायला मिळत आहे. 58 सामने झाले असले तरी अजूनही एकाही टीमला अधिकृतरित्या क्वालिफाय करता आलं नाहीये. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सची (Mumbai indians) टीम आयपीएल हंगामातून बाहेर पडल्याने पलटणचे चाहते अधिकच नाराज असल्याचं पहायला मिळतंय. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली मुंबईला यंदा चांगली कामगिरी करता आली नाही. आत्तापर्यंत त्यांना केवळ 4 सामनेच जिंकता आले आहेत. अशातच आता रोहित शर्मा (Rohit Sharma) पुढील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही, अशी भविष्यवाणी पाकिस्तानचा माजी स्टार खेळाडू वसिम अक्रम (Wasim Akram) याने केली आहे. 

मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या खांदेपालटवरून वसिम अक्रमने नाराजी व्यक्त केली. हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी दिल्याने मुंबई इंडियन्सचे फॅन्स निराश आहेत. मला वाटत नाही की, रोहित शर्मा आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा भाग असेल, अशी भविष्यवाणी वसिम अक्रम (Wasim Akram On Rohit Sharma) याने केली आहे. त्यावेळी वसिम अक्रमने रोहितच्या फलंदाजीचं देखील कौतूक केलं. तर रोहितला आगामी सिझनमध्ये कोलकाताकडून (KKR) खेळताना पहायला आवडेल, असंही वसिम अक्रमने म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाला वसिम अक्रम?

मला तरी वाटत नाही की, रोहित शर्मा यापुढे मुंबई इंडियन्सकडून खेळेल. मी त्याला गौतम गंभीरच्या कोलकातासोबत पाहणं पसंत करेल. विचार करा की, गौतम गंभीर केकेआरचा मेन्टॉर असेल, श्रेयस अय्यर केकेआरचा कॅप्टन असेल आणि रोहित शर्मा केकेआरकडून ओपनिंग करेल. असं झाल्यास केकेआरकडे खूप तगडी फलंदाजी असेल. कोलकाताच्या मैदानात रोहित शर्मा खूर चांगली बॅटिंग करतो. तो कुठेही उत्तम फलंदाजी करू शकतो, पण त्याला कोलकतामध्ये पाहणं परफेक्ट असेल, असंही वसिम अक्रमने म्हटलं आहे.

दरम्यान, यंदाच्या हंगामात रोहित शर्माला खास कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा आणि इशान किशनने उत्तम सुरूवात करून दिली खरी पण मुंबईची मिडल ऑर्डर मैदानावर थांबा धरू शकली नाही. रोहित शर्माने यंदाच्या हंगामात 12 सामन्यात 152.77 च्या स्ट्राईक रेटने 330 धावा केल्या आहेत. तर मागील काही सामन्यात त्याची फलंदाजी धुसर राहिलीये. त्यामुळे आता रोहित मुंबई इंडियन्सला नारळ देण्याच्या तयारीत आहे का? असा सवाल विचारला जातोय.

मुंबई इंडियन्स प्लेऑफमधून बाहेर (MI Eliminate From IPL 2024)

सनरायझर्स हैदराबादने लखनऊचा पराभव केल्यानंतर मुंबई इंडियन्सचा मोठा धक्का बसला. आयपीएल हंगामामधून बाहेर पडणारी पहिली टीम म्हणून मुंबई इंडियन्सची नोंद झालीये. त्यामुळे आता रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2024) आराम मिळणार का? असा सवाल देखील विचारला जात आहे.