IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचं रिकी पॉटिंग यांनी सांगितलं कारण

IPL 2021 राजस्थान विरुद्ध दिल्ली- रिकी पॉटिंग यांनी चूक मान्य करत दिल्ली संघाच्या पराभवामागे काय कारण हे सांगितलं

Updated: Apr 16, 2021, 02:10 PM IST
IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचं रिकी पॉटिंग यांनी सांगितलं कारण title=

मुंबई:  राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला कडवी हार स्वीकारावी लागली. 3 विकेट्सने राजस्थान रॉयल्स संघ विजयी झाला आहे. दिल्लीच्या पराभवानंतर ऋषभ पंतने खंत व्यक्त केली तर रिकी पॉटिंग यांनी नेमकं काय चुकलं आणि कोणत्या कारणामुळे पराभव झाला हे सांगितलं आहे. 

उत्तम गोलंदाजी करून देखील दिल्ली संघावर राजस्थानच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवत निसटता विजय खेचून आणला. आर अश्विनला पूर्ण 4 ओव्हर्स गोलंदाजी करू न दिल्याचं रिकी पॉटिंग यांनी सांगितलं. आर अश्विनला 4 ओव्हर्स पूर्ण गोलंदाजी दिली नाही हीच चूक झाल्याचं त्यांनी सांगितलं. संपूर्ण टीम जेव्हा एकत्र येईल तेव्हा आम्ही यावर सविस्तर चर्चा करू असंही ते म्हणाले. 

आर अश्विननं दिल्ली कॅपिटल्स संघाकडून तीन ओव्हर्स गोलंदाजी केली. या गोलंदाजी दरम्यान त्याने 4.66 इकनॉमिक रेटनं 14 धावा दिल्या. त्याने जरी एकही विकेट घेतली नसली तरी त्याने जास्त धावा देखील राजस्थान संघाला दिल्या नव्हत्या. त्यामुळे चौथी ओव्हर देखील त्याला खेळवणं गरजेचं होतं. मात्र ती खेळवली न गेल्यानं राजस्थान रॉयल्स संघाला पुढे रन काढणं अधिक सोपं झालं.

व्हिडीओ- रिकी पॉटिंग नेमकं काय म्हणाले ऐकण्यासाठी इथे क्लिक करा

चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध झालेल्या सामन्यात आर अश्विनची कामगिरी विशेष चांगली नव्हती. त्याने 4 ओव्हरमध्ये चेन्नईला 47 धावा दिल्या तर 1 विकेट घेतली. मात्र त्यानंतर आर अश्विननं मेहनत घेऊन आपली उत्तम कामगिरी राजस्थान विरुद्धच्या सामन्यात दाखवली. मात्र ऐनवेळी त्याला चौथी ओव्हर गोलंदाजी न करू दिल्यानं त्याचा मोठा फटका दिल्ली कॅपिटल्स संघाला बसला आहे.