विकेट घेताच इशांत शर्माने विराटला भर मैदानात केली धक्काबुक्की; Video Viral झाल्याने चाहते हैराण

रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये बंगळूरूचा 47 रन्सने पराभव झाला होता. एम चिन्नस्वामी मैदानावर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात चाहत्यांची विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र अवघ्या 27 रन्सवर तो इशांत शर्माच्या गोलंदाजीवर विकेट गमावून बसला. यावेळी कोहलीची विकेट काढल्यानंतर इशांत शर्मा आणि कोहलीमध्ये धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

सुरभि जगदीश | Updated: May 13, 2024, 08:11 AM IST
विकेट घेताच इशांत शर्माने विराटला भर मैदानात केली धक्काबुक्की; Video Viral झाल्याने चाहते हैराण title=

Virat Kohli and Ishant Sharma Fight: रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये बंगळूरूचा 47 रन्सने पराभव झाला होता. एम चिन्नस्वामी मैदानावर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात चाहत्यांची विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र अवघ्या 27 रन्सवर तो इशांत शर्माच्या गोलंदाजीवर विकेट गमावून बसला. यावेळी कोहलीची विकेट काढल्यानंतर इशांत शर्मा आणि कोहलीमध्ये धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

विराट-इशांतमध्ये धक्काबुक्की

विराट कोहली आणि इशांत शर्मा खूप जुने मित्र आहेत. दोघंही खेळाडू दिल्लीच्या राज्याकडून खेळले आहेत. याशिवाय दोघंही टीम इंडियासाठी एकत्र खेळले आहेत. आयपीएलमध्ये प्रथमच विराट कोहलीला इशांतने बाद केलं. मुळात ज्या ओव्हरमध्ये इशांतने कोहलीला बाद केले, त्या ओव्हरमध्ये मजेशीर भांडण पाहायला मिळालं. यावेळी ते एकमेकांना मस्करीच्या भावाने धक्का मारताना दिसले. विराटने बाद होण्यापूर्वी शानदार सिक्स ठोकला तेव्हा तो इशांतचा आनंद लुटत होता. मात्र यानंतर लगेच विराट बाद झाला.

दोघांच्याही धक्काबुक्कीचा व्हिडीओ व्हायरल

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच इशांत शर्माने विराट कोहलीची विकेट पटकावली. विराटने इशांत शर्माच्या 10 बॉल्सचा सामना केला. ज्यामध्ये दोन सिक्स आणि एक चौकार लगावला. डावाची चौथी ओव्हर आणणाऱ्या इशांत शर्माने चौथ्या बॉलवर विराट कोहलीला विकेटकीपर अभिषेक पोरलकडे कॅच आऊट केलं. कोहलीची विकेट घेताच इशांतच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि तो मस्करी करताना दिसला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

आरसीबीकडून दिल्लीचा पराभव

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 ओव्हर्समध्ये 9 गडी गमावून 187 रन्स केले. यावेळी आरसीबीकडून सर्वाधिक रन्स रजत पाटीदारने केल्या. पाटीदारने 32 बॉल्समध्ये अर्धशतक झळकावलं आणि 52 धावांची खेळी खेळली. ज्यामध्ये 3 फोर आणि 3 सिक्सेसचा समावेश होता. दुसरीकडे विल जॅकने 29 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. याशिवाय कॅमेरून ग्रीनने 24 चेंडूंत 32 रन्स केले आणि नाबाद राहिला. आरसीबीच्या 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अक्षरचे अर्धशतक झळकावलं. यावेळी शाई होप (29) सोबत पाचव्या विकेटसाठी केलेल्या 56 रन्सची अर्धशतकी खेळी असूनही दिल्लीची टीम 19.1 ओव्हर्समध्ये 140 रन्समध्ये ऑलआऊट झाली.