सराव करताना टीम डेव्हिड अन् इशान किशन भिडले, मुंबई इंडियन्सने दिली वॉर्निंग; पाहा Video

Tim David Ishan Kishan Fight : मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज इशान किशन आणि टीम डेव्हिडचा कुस्तीचा व्हिडिओ मुंबईच्या (Mumbai Indians) अधिकृत सोशल मीडियावरून शेअर करण्यात आलाय. 

सौरभ तळेकर | Updated: May 16, 2024, 06:42 PM IST
सराव करताना टीम डेव्हिड अन् इशान किशन भिडले, मुंबई इंडियन्सने दिली वॉर्निंग; पाहा Video title=
Tim David Ishan Kishan Fight

Mumbai Indians : कॅप्टन बदलल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाची सुमार कामगिरी पहायला मिळाली. यंदाच्या आयपीएल हंगामातून बाहेर पडणारा पहिला संघ म्हणून मुंबई इंडियन्सची नोंद झाली. आता मुंबई इंडियन्स त्यांच्या अखेरचा सामना लखनऊविरुद्ध (MI vs LSG) खेळणार आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्सचे खेळाडू सराव करत असताना एक घटना सराव करताना मैदानावर घडली. त्याचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. यामध्ये इशान किशन आणि टीम डेव्हिड यांच्यात (Tim David Ishan Kishan Fight) कुस्तीचा सामना रंगल्याचं दिसून आलं.

मुंबई इंडियन्सचा अखेरचा सामना वानखेडे मैदानावर होणार आहे. लखनऊ सुपर जाएन्ट्सविरुद्ध मुंबई अखेरच्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. येत्या 17 मे रोजी हा सामना होणार आहे. त्यासाठी आता मुंबई इंडियन्सचा संघ वानखेडेवर तयारी करत आहे. मात्र, क्रिकेटची तयारी नव्हे तर इथं खेळाडूंची वेगळीच तयारी सुरू असल्याचं पहायला मिळतंय. मुंबई खेळाडू करतायेत कुस्तीची तयारी... होय मुंबई इंडियन्सचे खेळाडूंनी चक्क दंड थोपटलेत. इशान किशन आणि टीम डेव्हिड यांची एकमेकांविरुद्ध कुस्तीचा डाव टाकला.

इशान किशनने टीम डेव्हिडला धोबीपधाड देण्याचा प्रयत्न केला. पण डेव्हिड पण कमी नव्हता. टीम डेव्हिडने कमी उंचीच्या इशानला रोखलं अन् त्याला उलटी पलटी देण्याचा प्रयत्न केला. इशानने डेव्हिडचा पाय उचलून त्याला ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला. पण उंची कमी असल्याने इशानला ते जमलं नाही. अखेर टीम डेव्हिडने इशानला नॉक केलं अन् पाठीवर टेकवलं. त्यानंतर कोचने रेफरीचं काम केलं अन् कुस्ती सोडवली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

पाहा Video

मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ - रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, हार्दिक पंड्या (C), रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड, क्वेना माफाका.