WTC Final: ना पंत ना संजू, 'हा' खेळाडू असेल टीम इंडियाचा विकेटकीपर; Ravi Shastri यांची मोठी भविष्यवाणी

World Test Championship final Final: फायनलमध्ये कोणता खेळाडू विकेटकिपींगची जबाबदारी सांभाळणार? केएल राहूलला (KL Rahul) संधी मिळणार की नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणतात...

Updated: Mar 18, 2023, 09:58 PM IST
WTC Final: ना पंत ना संजू, 'हा' खेळाडू असेल टीम इंडियाचा विकेटकीपर; Ravi Shastri यांची मोठी भविष्यवाणी title=
WTC Final, Ravi Shastri

Ravi Shastri On KL Rahul: टीम इंडियाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटने धुव्वा उडवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात खास कामगिरी केली ती स्टार विकेटकिपर केएल राहुल (KL Rahul) याने. फलंदाजीसोबतच त्याने उत्कृष्ट यष्टिरक्षणही केलंय. त्यामुळे क्रिडाविश्वात सध्या त्याच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. राहुल पुन्हा फॉर्ममध्ये आलाय, अशी चर्चा आता सुरू होताना दिसते. अशातच आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मोठं वक्तव्य केलंय. (Neither Pant nor Sanju KL Rahul Will Be Wicket keeper in WTC Final Big prediction of Ravi Shastri latest sports news)

एकीकडे ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात पाणी पाजल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) फायनलबाबत (Final) नवा वाद सुरू झालाय. फायनलमध्ये कोणता खेळाडू विकेटकिपींगची जबाबदारी सांभाळणार? केएल राहूलला संधी मिळणार की नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. 

आणखी वाचा - IPL 2023: ...अन् रोहित शर्मा Mumbai Indians चा कॅप्टन झाला, अनिल कुंबळेंनी केली पोलखोल!

दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जूनमध्ये इंग्लंडमधील ओव्हलवर (Oval Stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्यात विकेटकिपिंग कोण करणार यावर रवी शास्त्री (Ravi Shastri On KL Rahul) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाले रवी शास्त्री?

इंग्लंडमध्ये तुम्हाला जास्त फिरकीपटू खेळवायचे नाहीत, त्यामुळे फलंदाजी मजबूत असावी लागते. केएल राहुल विकेटकीपिंग करू शकला तर भारत आपली फलंदाजी मजबूत करू शकतो. राहुल मधल्या फळीत 5 किंवा 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, ज्यामुळे टीम इंडियाला इंग्लंडमध्ये मदत होईल. त्यामुळे केएल राहुलला संघात संधी मिळायला हवी, असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राहुलने पहिल्या सामन्यात पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलंय आणि आपल्या टीकाकारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे आता त्याला WTC च्या फायनलमध्ये (WTC Final 2023) संधी मिळणार की नाही? याची वाट क्रिकेट चाहते पाहताना दिसत आहेत.