KL Rahul LSG IPL 2024: गेल्या काही दिवसांपूर्वी आयपीएलमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यामध्ये लखनऊ सुपर जाएंट्सने संजीव गोएंका पराभवानंतर केएल राहुलला ओरडत होते. या व्हिडीओमध्ये केएल राहुल देखील अगदी शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकून घेत होता. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी संजीव गोएंकांना ट्रोल करण्यात येतंय. तर यावर आता लखनऊ सुपर जायंट्सचे सहाय्यक प्रशिक्षक लान्स क्लुजनर यांनी कर्णधार केएल राहुलबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
एका इंग्रजी संकेतस्थळाला माहिती देताना क्लुसनर म्हणाले, "मला वाटतं की, हे दोन क्रिकेटप्रेमींमधील संभाषण होतं. आम्हाला थेट संभाषण करायला आवडतं. मला यात काही अडचण वाटली नाही. अशा संभाषणामुळे टीम अधिक चांगला होते. आमच्यासाठी ही कोणत्याही प्रकारे मोठी गोष्ट नाही. राहुल चांगल्या ठिकाणी असून गेल्या अनेक सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे.
सनरायझर्स हैदराबादने आयपीएलमधील सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्सचा वाईट पद्धतीने पराभव केला होता. या सामन्यानंतर गोएंका कर्णधार केएल राहुलवर चिडताना दिसले. त्यामुळे गोएंका सोशल मीडियावर ट्रोलही झाले होते. या प्रकरणानंतर राहुल टीमचं कर्णधारपद सोडू शकतात अशा चर्चाही रंगल्या होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे टीमचा कर्णधार राहुल यांने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.
सोशल मीडिया युझर्सना मात्र हे वागणं रूचलेलं नाही. चाहत्यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणत्याही मालकाने खेळाडूंशी अशा प्रकारे संवाद साधू नये. याचं कारण म्हणजे मैदानात अनेक कॅमेरे असून सर्व गोष्टी त्यात टिपल्या जातात.
संजीव गोयंका हे भारतातले प्रसिद्ध उद्योगपती आहेत. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत संजीव गोयंका यांचा समावेश होता. RPSG ग्रुपचे ते अध्यक्ष आहेत. विविध क्षेत्रात गोयंका समुहाचा उद्योग पसरला आहे. यात पॉवर, कार्बन ब्लॅक, आयटीईएस, कन्झ्युमर अँड रिटेल, मीडिया अँड एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स, एज्युकेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध उद्योगात गोयंका समुह काम करतं. त्यांच्या अनेक कंपन्यांमध्ये 50,000 हून अधिक कर्मचारी आहेत.