रोहित शर्मा हे काय करुन बसला? खेळाडूला शिवीगाळ करतानाचा Video Viral

Rohit Sharma Viral Video : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यादरम्यान रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होतो आहे. त्याचं धक्कादायक कृत्यामुळे चाहत्यांचा भुवया उंचावल्या आहे. 

Updated: Jun 9, 2023, 10:34 AM IST
रोहित शर्मा हे काय करुन बसला? खेळाडूला शिवीगाळ करतानाचा Video Viral title=
wtc final 2023 Rohit Sharma abused the Cheteshwar Pujara video viral IND vs AUS WTC Final 2023 Cricket Trending News

WTC Final Rohit Sharma Viral Video : इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship) फायनल सामना रंगतोय. मात्र पहिल्या आणि दुसऱ्या दिवशाच्या अखेर (IND vs AUS WTC Final 2023) टीम इंडियाने निराशाजनक कामगिरी केली आहे. दोन्ही दिवस टीम इंडियाच्या खेळाडूंची कामगिरी पाहून विराट कोहलीचाही पार चढला. खेळाडूंना शिवीगाळ करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Team India) 

नेमकं काय घडलं?

या व्हिडीओ तुम्ही पाहू शकता, रविंद्र जडेजा बॉलिंग करत असताना रोहित शर्मा इतर खेळाडूंशी चर्चा करतना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो पुजाराचे (Cheteshwar Pujara) नाव घेत शिव्या घालताना ऐकू येत आहे. आयपीलमध्ये चमकदार कामगिरी करणारे भारतीय खेळाडू मात्र ऑस्ट्रेलियासमोर फेल ठरताना दिसत आहे. 71 रन्समध्ये भारतीय संघाचे चार खेळाडू पटापट आऊट होऊन तंबूत परतले. कॅप्टन रोहित शर्मा आणि आयपीएल स्टार शुभमन गिलची बँटही कमाल दाखवू शकली नाही. (wtc final 2023 Rohit Sharma abused the Cheteshwar Pujara video viral IND vs AUS WTC Final 2023 Cricket Trending News)

कांगारुसमोर टीम इंडियाचा फ्लॉप शो!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील सामन्यात दोन्ही दिवस ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व दिसून आलं. नाणेफेक टीम इंडियाने जिकंली पण बॉलिंगचा निर्णय रोहित शर्माचा चुकीचा ठरताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी कांगारुने जोरदार बँटिंग करत 327 रन्स केले आणि तेही 3 खेळाडू गमवत. 10 वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघ आयसीसीच्या एखाद्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचली तर खरी पण तिची कामगिरी पाहत भारतीयांची निराशा होतेय.

चेतेश्वर पुजारीची कामगिरी काही कमाल करु शकली नाही 14 रन्स करत तो तंबूत परतला.  सऱ्या दिवसाच्या खेळ अखेर मैदानात अजिंक्य रहाणे आणि श्रीकर भरत मैदानात होते. भारताचा मोहम्मद सिराजच्या चार विकेटमुळे भारतीय संघाकडून अपेक्षा होती पण त्याला फलंदाजांनी साथ दिली नाही. त्यामुळे रोहित शर्माचा पार चढताना दिसला. पुजाराला शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर No-No-Crix  या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 

दरम्यान टीम इंडियासमोर फॉलोऑनचा धोका असल्याने आज तिसऱ्या दिवशी टीमला किमान 270 रन्सपर्यंत मजल मारावी लागणार आहे. दुसऱ्या दिवशी टीम इंडिया पाच विकेट गमवत 151 रन्स केले आहे. याचा अर्थ आज टीम इंडियाला संयम राखत आणि एकही विकेट न गमावता 119 धावसंख्या करणे गरजेचं आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु करण्यासाठी भारताकडून अंजिक्य रहाणे आणि केएस भरत मैदानात उतरणार आहे.