IPL 2023: युझीच्या तालावर थिरकला रुट, रंगली जुगलबंदी; Video पाहून तुम्हीच सांगा.. कोण सरस?

Yuzi Chahal Dance Video: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या दोघांचा व्हिडिओ (Yuzi Chahal Dance With Joe Root) शूट केला आहे. त्यामुळे आता सर्वांची चर्चा होताना दिसते. दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली.  

सौरभ तळेकर | Updated: Apr 7, 2023, 03:14 PM IST
IPL 2023: युझीच्या तालावर थिरकला रुट, रंगली जुगलबंदी; Video पाहून तुम्हीच सांगा.. कोण सरस?  title=
Yuzi Chahal, Joe Root

Yuzi Chahal Dance With Joe Root: आयपीएलला (IPL 2023) धडाकेबाज अंदाजात सुरूवात झाल्यानंतर आता आयपीएलचे विविध रंग पहायला मिळत आहे. ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ, खेळाडूंच्या धमाल मस्तीचे व्हिडिओ, सेलिब्रेशनचे व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. आयसीबी आणि केकेआरच्या (RCB vs KKR) सामन्यानंतर शाहरुख खान (Shah rukh Khan) आणि विराट कोहली (Virat Kohli) नाचताना दिसत होते. अशातच आता टीम इंडियाचा करामती खेळाडू यझुवेंद्र चहल (Yuzi Chahal Dance Video) याचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे.

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) पुढील सामना 8 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्ससोबत (RR vs DC) होणार आहे. राजस्थान रॉयल्सचे होम ग्राऊंड असलेल्या गुवाहाटीतील बारसापारा (barsapara) येथे हा सामना होणार आहे. मागील सामना देखील याच ग्राऊंडवर असल्याने राजस्थानचा संघ गुवाहाटीमध्येच (Guwahati) आहे. (Yuzi Chahal Dance With Joe Root goes viral before ipl 2023 rr vs dc watch video)

आणखी वाचा - Team India: ना पांड्या ना सूर्या, AB De Villiers म्हणतो, 'हा' खेळाडू भारताचा कॅप्टन होणार!

दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी एक गेट टू गॅदर (gate to gather) केलं. एक छोटी पार्टी देखील आयोजित केली होती आणि प्रत्येकाने काहीतरी किंवा इतर सादर केलं. जो रूट (Joe Root) आणि युझवेंद्र चहल (Yuzi Chahal) यांनी यावेळी भन्नाट डान्स केला. त्याचबरोबर जॉस बटलर आणि ट्रेंट बोल्ट यांनी गाणं देखील गायलं. मात्र, यावेळी चर्चा रंगली ती युझी आणि रुटच्या ड़ान्सची.

पाहा Video 

दरम्यान, या पार्टीवेळी इंग्लंडचा डॅशिंग खेळाडू जो रूट  (Joe Root Dance Video) याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. राजस्थान रॉयल्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या दोघांचा व्हिडिओ शूट केला आहे. त्यामुळे आता सर्वांची चर्चा होताना दिसते. दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली. व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा, डान्समध्ये कोण ठरलंय सरस?