pawar vs pawar

'मतदानाच्या आदल्या दिवशी शिरुर मतदारसंघात...' अमोल कोल्हेंचा गंभीर आरोप

Shirur Loksabha 2024 : महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय. मतदानाच्या आदल्या दिवशी शिरुर मतदारसंघात पैसे वाटप होण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

May 10, 2024, 04:45 PM IST

बारामतीत मतदानाचा टक्का घसरला, घटलेलं मतदान कुणाच्या पथ्यावर?

Loksabha 2024 Baramati Constituency : राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळ मतदानाचा टक्का घसरलाय. गेल्या वेळेच्या तुलनेत यावे तब्बल पाच टक्के मतदान कमी झालय. बारामतीतील घटलेलं मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार या विषयी आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

May 8, 2024, 07:18 PM IST

शांत बारामतीत मतदानादिवशी 'महाभारत' पैसे वाटप, मारहाणीच्या घटनांनी वातावरण तापलं

Loksabha 2024 Baramati : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा पार पडला. राज्यातच नाही तर देशात लक्षवेधी ठरलेल्या बारामतीत यंदा महाभारत पाहायाला मिळालं. पैसे वाटतानाचे व्हिडिओ, कार्यकर्त्यांना शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोपांमुळे बारामतीत वातावरण तापलेलं होतं..

May 7, 2024, 07:50 PM IST

बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान सुरु असून यापैकी बारामती लोकसभा मतदारसंघामधल्या हाय व्होल्टेज लढाईकडे सर्वांचंच लक्ष आहे.

May 7, 2024, 02:40 PM IST

प्रचारासाठी पॉवरफुल 'पवार लेडीज', लेकीसाठी आई प्रतिभा पवार मैदानात

Loksabha 2024 : महाराष्ट्रात सर्वाधिक लक्षवेधी लढत ठरतेय ती बारामती लोकसभा मतदारसंघाची. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी पवार विरुद्ध पवार लढत होतेय. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातील सगळ्या महिला मैदानात उतरल्यात..

May 3, 2024, 06:41 PM IST

ज्यांच्याविरुद्ध लढा, त्या सुनेत्रा पवारांकडूनच 55 लाखांचं कर्ज... सुप्रिया सुळेंच्या प्रतिज्ञापत्रातून खुलासा

Loksabha 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात पवार वि. पवार अशी लढत रंगतेय. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Apr 18, 2024, 07:08 PM IST

'पवार कुटुंबात कुठेही मॅचफिक्सिंग नाही, स्टॅम्पपेपरवर लिहून देतो' अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करुन बाहेर पडल्यानंतर अजित पवार यांनी पवार कुटुंबियांच्या काही कार्यक्रमांना हजेरी लावली. पण यात कोणतंही मॅचफिक्सिंग नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्यासोबत आलेल्यांबरोबर फसवणूक करायची नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

Dec 22, 2023, 05:26 PM IST

राष्ट्रवादी ऑफिसात 'नेमप्लेट'चं राजकारण, विधिमंडळ पक्ष कार्यालयावर दोन्ही गटांचा दावा

Pawar vs Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद आता ऑफिसपर्यंत येऊन पोहोचलाय. नागपूर विधान भवनात राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाला दिलेलं ऑफिस नेमकं कुणाचं, यावरून वादावादी सुरू झालीय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याचे पडसाद उमटले. 

Dec 7, 2023, 06:54 PM IST

'सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार म्हणाले' अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar : कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात बोलताना अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार यांनी आपल्याला सांगितल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

Dec 1, 2023, 01:44 PM IST

पवारांच्या कार्यक्रमाला अजितदादा नाहीच, काटेवाडीत भेटीगाठी, बारामतीत दांडी

Pawar vs Pawar : बारामतीतल्या गोंविदबागेत यंदाही दिवाळी पाडवा साजरा झाला. मात्र या सोहळ्याला अजित पवारांनी दांडी मारली. यावर आजारपणामुळे कोणी आलं नाही तर गैरसमजाचं कारण नाही असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.

Nov 14, 2023, 06:35 PM IST

'अजित पवार हे राष्ट्रवादीचेच नेते' वक्तव्यावरुन 4 तासात शरद पवारांचं घुमजाव, आता म्हणतात...

अजित पवार हे आमचेच नेते असं म्हणणाऱ्या शरद पवार यांनी आता घुमजाव केला आहे. अजित पवार यांनी आता पुन्हा संधी मागू नये, ते आमचे नेते आहेत असं मी म्हटलंच नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे पुन्हा एका संभ्रम निर्माण झाला आहे. 

Aug 25, 2023, 02:08 PM IST

शरद पवारांच्या हातात मुख्यमंत्रिपदाची दोरी, राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार?

राज्याच्या राजकारणात दररोजच धक्कादायक गौप्यस्फोट होताना दिसतायत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त भेटीनेही राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.. त्याची चर्चा संपत नाही तोवरच मोठा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय

Aug 16, 2023, 07:36 PM IST