Bullet नाही तर Royal Enfield च्या 'या' बाईकची मार्केटमध्ये हवा, मायलेज तर विचारूच नका!

Royal Enfield Best Selling Bike : विक्रीच्या आकड्यात, देशातील टॉप-10 सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाइक्सच्या यादीत ती 9व्या क्रमांकावर आहे.

सौरभ तळेकर | Updated: Dec 22, 2023, 09:04 PM IST
Bullet नाही तर Royal Enfield च्या 'या' बाईकची मार्केटमध्ये हवा, मायलेज तर विचारूच नका! title=
Royal Enfield Classic 350

Royal Enfield Classic 350 : भारतीय तरुणांमध्ये गाड्यांचं फार आकर्षण आहे. अनेक तरूण स्टायलिश गाड्यांसाठी खर्च करतात. त्यातच बुलेटचा देखील समावेश होते. बुलेट घेयची म्हणून अनेकजण प्रयत्न करतात. मात्र, सध्या रॉयल एनफील्ड एका गाडीने मार्केट जाम केलंय. रॉयल एनफील्डच्या ब्रँडमुळे अनेकजण आकर्षित होता. गेल्या काही काळात रॉयल एनफिल्डने बुलेटला अनेक वेळा अपडेट केले. काही वर्षांपूर्वी रॉयल एनफिल्डची सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल ही बुलेट असायची, मात्र आता बुलेटची जागा क्लासिक 350 ने घेतली आहे. 

रॉयल एनफील्ड क्लासिकची हवा!

नोव्हेंबर 2023 मध्ये रॉयल एनफील्ड क्लासिक 350 च्या एकूण 30,264 युनिट्सची विक्री झाली आहे, जी नोव्हेंबर 2022 मधील 26,702 युनिट्सच्या विक्रीपेक्षा 13.34% अधिक आहे. या विक्रीच्या आकड्यासह, देशातील टॉप-10 सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाइक्सच्या यादीत ती 9व्या क्रमांकावर आहे.

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ची किंमत दिल्ली बाजारात 1.93 लाख ते 2.24 लाख रुपये आहे. यात सिंगल चॅनल एबीएस आणि ड्युअल चॅनल एबीएसचा पर्याय आहे. बाइकमध्ये 350 सीसी सिंगल सिलेंडर 4-स्ट्रोक एअर-कूल्ड इंजिन आहे. हे 20.2 पीएस आणि 27 एनएम पॉवर आउटपुट आहे. यात 5-स्पीड कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स आहे. बाईकचे कर्ब वजन 195 किलो आहे. त्याचबरोबर गाडीमध्ये 13 लिटरची इंधन टाकी देखील आहे.

बाईकमध्ये अॅनालॉग आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसबी चार्जिंग पोर्ट, डिजिटल ओडोमीटर, नेव्हिगेशन, सर्व्हिस ड्यू इंडिकेटर, लो फ्युएल इंडिकेटर, पास स्विच, इंजिन किल स्विच, बल्ब टाईप टर्न सिग्नल लॅम्प आणि हॅलोजन हेडलाइट आहेत. त्याचबरोबर गाडीची मायलेज 36.2 किलोमीटर प्रति लिटर आहे.

दरम्यान, रॉयल एनफील्ड क्लासिक 350 (Royal Enfield Classic 350) बाईक मॉडेलचे सस्पेन्शन आणि ब्रेक बघितले तर, कंपनीने 6 स्टेप अॅडजस्टेबल प्रीलोडसह ट्विन ट्यूब इमल्शन शॉक ऍब्जॉर्बर सस्पेंशन दिले आहे. बाईक सिंगल आणि ड्युअल चॅनल एबीएस सह येते. ब्रेकिंगसाठी, समोर 300 मिमी डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 270 मिमी डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.