Whatsapp व्हिडीओ कॉल आणि चॅट सुरक्षित? वाचा अत्यंत महत्त्वाच्या टीप्स

रोजच्या वापरातील व्हाट्सअप व्हिडिओ कॉल आणि चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी या टीप्स माहित असायलाच हव्या.

Updated: Mar 10, 2021, 09:29 AM IST
Whatsapp व्हिडीओ कॉल आणि चॅट सुरक्षित? वाचा अत्यंत महत्त्वाच्या टीप्स title=

व्हाट्सऍप (WhatsApp) प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य मॅसेजिंग ऍप बनले आहे. व्हाट्सअप जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे मॅसेजिंग ऍप आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपण व्हाट्सअपचे चॅट आणि नोटीफिकेशन चेक करीत असतो. अनेकांचा तासन् तास व्हाट्सअपवर व्हिडिओ कॉल सुरू असतो. त्यामुळे व्हाट्सअपवर आपण करीत असलेला चॅट आणि व्हिडिओ कॉलचा डेटा सुरक्षित आहे ना याकडे आवर्जुन लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा तुमच्या गोपनियतेला धोका पोहचू शकतो. 
 
व्हाट्सअप खरेतर end-to-end encryption असते. त्यामुळे दोन व्यक्तींमधील संभाषण इतर कोणालाही पाहता वाचता येत नाही. हे संभाषण संबधित वापरकर्त्यांच्या फोनमध्येच पाहता येईल. व्हाट्सअप चॅट आणि व्हिडिओ कॉल end-to-end encryption ने सुरक्षित असते. तरीसुद्धा आणखी सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या टीप्स पाहूयात

 1 : गोपनिय आणि संवेदनशील चॅटसाठी encryption तपासा

'जरी व्हाट्सअपने सर्व चॅट आणि डेटा डीफॉल्ट encryption केले्ल्या असल्या तरी पुन्हा चेक करणे गरजेचे असते. आपण संपर्कातील व्यक्तींना क्रेडिट कार्डची किंवा अन्य गोपनिय माहितीची देवाणघेवाण करतो. त्याकरीता encryption पुन्हा तपासणे गरजेचे ठरते.

encryption तपासण्यासाठी - view contact -> encryption -> verify security code -> यानंतर समोर आलेल्या QR कोड दोन्ही संपर्कांनी (verify) सत्यापित करणे

2. सुरक्षा सूचना सुरू करा  Turn On Security Notifications 

व्हाट्सअपचे चॅट आणि डेटा सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षा सूचना नेहमी  सुरू ठेवाव्यात.
WhatsApp -> Settings -> Account -> Security -> Show security notifications
 येथे गेल्यानंतर  सूरक्षा सूचनांचा टोगल उजवीकडे ठेवावा. तो हिरव्या रंगात प्रदर्शित होतो.

3. द्वीचरण सत्यापण करा Enable Two-Step Verification

व्हाट्सअपच्या सुरक्षेचे दोन स्तरांमध्ये सत्यापण होते. सहा अंकाचा पिन कोडद्वारे  हे सत्यापण होते. हा कोड विसरल्यास आण व्हाट्सअपला दिलेल्या ईमेलच्या पत्त्यावर हा को़ड पुन्हा मिळवता येतो. 

या सुरक्षा पर्यायामुळे आपल्या परवानगी शिवाय इतर कोणत्याही उपकरणावर आपला डेटा  दिसू शकत नाही. 

4. व्हाट्सअप सुरक्षित  ठेवण्यासाठी थर्डपार्टी लॉकर

व्हाट्सअपचे स्वतःचे ऍप लॉकर नाही. परंतु सहा अंकी पिन कोडद्वारे डेटा सुरक्षित ठेवता येतो. त्याशिवाय ऍंड्राइडवरील थर्डपार्टी लॉकर ऍप वापरणेही योग्य ठरते. 

5. क्लॉउड बॅकअप बंद करा Disable Cloud Backups

व्हाट्सअप encryption हे सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम आहे. तरीसुद्धा एक त्रुटी म्हणजे क्लॉउड बॅकअप होय. गुगल ड्राइव्हवर किंवा आयक्लाउडवर आपल्या संभाषणाचा बॅकअप सुरू असतो. तो Disable केल्यास सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ठरू शकते. 
खरेतर, बॅकअप घेतलेला डेटा encrypted असल्यामुळे कोणालाही वाचणे शक्य नाही.  परंतु बॅकअप पुन्हा इन्स्टॉल केल्यास  जुने संभाषण संबधित स्मार्टफोनमध्ये वाचता येऊ शकते.
आपण स्मार्टफोन बदलणार असू किंवा इतर कोणत्याही कारणामुळे गरज भासल्यास त्या वेळी बॅकअप घेता येणे शक्य  असते.

 WhatsApp -> Menu -> Settings -> Chats -> Chat Backup -> Backup to Google Drive -> Never

6. स्पॅम मॅसेजिंगपासून दूर रहा Beware of Common Scams

 व्हाटअप आपल्या ऍपसाठी कधीही वापरकर्त्यांना पैशाची मागणी करीत नाही. त्यामुळे प्रिमियम व्हाट्सअप, गोल्ड व्हाट्सअप असे विशेष ऍप घ्या आणि त्यासाठी अमूक इतके पैसे मोजा अशा मॅसेजेस पासून दूर रहा. व्हाट्सअपवर येणाऱ्या कोणत्याही स्पॅम लिंक ओपन करू नका. त्यामुळे तुमचे व्हाट्सऍप Socially engineered attacks करून हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

7. डेक्टटॉपवर अधिकृत व्हाटअप वेब वापरा Get the Official WhatsApp Desktop Apps

डेटा सुरक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका कंपनीच्या अहवालानुसार अनधिकृत व्हाट्सअप वेबचा वापर सर्वात मोठ्या धोक्यापैकी एक आहे.  त्यामुळे  आपण संगणक किंवा लॅपटॉपवर व्हाट्सअप वेब वापरत असू तर अधिकृत Desktop Apps चा वापर करा.

8. इतर महत्वाच्या गोपनिय सुरक्षा Protect Your Privacy on WhatsApp

व्हाटअपवर इतर गोष्टींचीही सुरक्षा महत्वाची ठरते जसे की,  Last Seen, profile photo, about, status, and live location, Read Receipts इत्यादी
या सर्व बाबी सुरक्षित करता येतात 
त्यासाठी Settings-> Account-> Privacy
यानंतर everyone किंवा my contact किंवा Nobody असे पर्याय निवडता येतात.

9. व्हाट्सअप सुरक्षित आहे का?

इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या कोणत्याही गोष्टी 100 टक्के सुरक्षित असतील असे नाही. परंतु व्हाट्सअप बद्दल बोलायचे झाल्यास व्हाट्सअपने स्वतःच्या सुरक्षा आणि गोपनिय बाबींना महत्व दिले आहे. त्या पर्यांयाचा नीट वापर केल्यास व्हाट्सअप पुरेसे सुरक्षित आहे. असे म्हणता येईल.