144 चित्रपटांत पोलीस साकारणारा अभिनेता! 'गिनीज'मध्ये नोंद, अमिताभ, अजय नाही तर..

पोलिसांच्या कथानकावर आधारित चित्रपटांची कमतरता नाही

बॉलिवूडमध्ये पोलिसांशी संबंधित कथानकावर आधारित चित्रपटांची तसेच पोलिसांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची कमतरता नाही.

पोलिसांच्या भूमिका अजरामर

अनेक कलाकारांची पोलिसांच्या भूमिका अजरामर केल्या आहेत. मग ती 'जंजीर'मधील अमिताभ बच्चन यांची भूमिका असो किंवा 'सिंघम'मधील अजय देवगणची भूमिका चांगलीच गाजली.

सलमानही झळकला पोलिसांच्या भूमिकेत

पोलिसांच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर 'दबंग'मधील सलमान खान असो अथवा अक्षय कुमारची 'सूर्यवंशी'मधील भूमिका असो, सर्वांनीच पोलिसांच्या भूमिकेला न्याय दिला आहे.

एका व्यक्तीचा विक्रम कोणीच मोडू शकत नाही

अनेक बड्या कलकारांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये पोलिसांची भूमिका साकारली असली तर सर्वाधिक वेळा मोठ्या पडद्यावर पोलिसांची भूमिक साकारण्यामध्ये एका व्यक्तीचा हात कोणीही धरु शकत नाही.

अमिताभ किंवा अजय देवगन नाही

विशेष म्हणजे सर्वाधिक वेळा पोलिसांची भूमिका साकारणारा कलाकार अमिताभ बच्चन किंवा अजय देवगण नाही.

कोण आहे हा अभिनेता?

सर्वाधिक वेळा पोलिसांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे, जगदीश राज! त्यांनी चक्क 144 चित्रपटांमध्ये पोलिसांची भूमिका साकारली आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद

तब्बल 144 चित्रपटांमध्ये पोलिसांच्या भूमिकेत झळकल्याबद्दल जगदीश यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. सर्वाधिक टाइप-कास्ट अभिनेता म्हणजेच सातत्याने एकच भूमिका साकारणारा अभिनेता अशी त्यांची नोंद करण्यात आली आहे.

पहिला चित्रपट 1956 चा

जगदीश यांनी सर्वात आधी 1956 साली प्रदर्शित झालेल्या 'सीआयडी' चित्रपटामध्ये पोलिसाची भूमिका साकारली होती. तर 2001 साली प्रदर्शित झालेला 'कसम' हा जगदीश यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

सहाय्यक अभिनेता म्हणून ही केलं काम

जगदीश यांनी मोठ्या पडद्यावरील पोलीस अधिक ओळख मिळवलेली तरी ते सहाय्यक अभिनेता म्हणून इतर भूमिकाही करायचे.

काही चित्रपटांमध्ये न्यायाधीशाची भूमिका

जगदीश यांनी काही चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली असून काहींमध्ये ते अगदी न्यायाधीश म्हणून झळकलेत.

अमिताभ यांनाही हा आकडा गाठता येणार नाही

अक्षय असो, अमिताभ असो किंवा अजय देवगण असो कोणालाही पोलिसांची भूमिका साकारण्यासंदर्भात जगदीश यांच्या या 144 चित्रपटांच्या आकड्याच्या आसपासही जाणं शक्य नाही.

VIEW ALL

Read Next Story