अंजीर खाऊन झटपट असं वजन कमी करा...

तुम्ही वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट प्लॅन कतरत असाल तर या डाएट दरम्यान शक्यतो आरोग्यदायी आणि पौष्टीक पदार्थ खाण्याचा विचार करा.

मॅक्रो आणि मायक्रोन्युट्रिएंट्सचा समावेश असल्याने अंजीर खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. कच्चा आणि वाळलेला अंजीर तुम्हाला आरोग्यासाठी फायदेशीर असून तो वजन कमी करण्यास मदत करू शकतो.

तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तेव्हा तुमची भूक कमी करणे गरजेचे आहे. अशावेळी तुम्ही जेवणादरम्यान ताजे किंवा वाळलेले अंजीर घेऊ शकता. फायबर भरलेले अंजीर खाल्ल्याने तुमचे पोट भरलेले राहते.

तसेच अनहेल्दी पदार्थ खाण्यापासून तुम्ही दूर राहता. जर तुम्ही सुके अंजीर खात असाल तर ते आधी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. असे केल्याने ते लवकर पचू शकतात. तसेच पोषक तत्वही मूबलक प्रमाणात मिळतात.

महत्वाचे म्हणजे अंजीरमध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळे कॅलरीज वाढत नसल्याने साहजिकच वजनही फारसे वाढत नाही. अंजीरात कॅल्शियम, लोह आणि पॉटेशियम जास्त प्रमाणात असल्याने तो खाऊन तुमचा स्टॅमिना वाढतो.

थोडे काम केल्यानंतर ज्यांना थकवा जाणवतो त्यांनी तर शक्ती वाढण्यासाठी अंजीर नक्कीच खावा. सकाळी एक ग्लास दुधाबरोबर अंजीर नियमित खाल्ल्यास तुमच्या स्टॅमिनात वाढ होऊन तुम्हाला उर्जा मिळते. एका ग्लास दुधात फक्त एक अंजीर उकळून प्यायल्याने फायदा होईल.

कच्चे अंजीर खायचा विचार करत असाल तर तुम्ही दिवसाला २-३ अंजीर सहज खाऊ शकता. वाळलेले अंजीर खायचा विचार असेल तर तीन अंजीर पुरेसे आहेत. मात्र ते रात्रभर भिजवून ठेवा.

मात्र, ज्या लोकांना मधुमेह , रक्ताशी संबंधित समस्या, यकृत आणि पचनाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी अंजीर खाताना काळजी घेणे आवश्यक आहे.

VIEW ALL

Read Next Story