हे पदार्थ हातावरील चरबी कमी करण्यासाठी उपयोगी

पूर्ण शरीराचं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दहा ठिकाणावरून सल्ले मिळत असतात. पण हातामध्ये जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी नक्की काय करायचं याबद्दल कोणीही सांगत नाही.

जास्त पाणी प्या (Drink Water)

अधिक चरबी घटवण्यासाठी पाणी सर्वात फायदेशीर ठरतं. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं योग्य नाही आयुर्वेदानुसार, आपल्या शरीरातील वजनच्या 10 व्या भागाला 2 ने वजा करून जी संख्या येते तितकं लीटर पाणी आपल्या शरीरात जायला हवं.

हेल्दी ब्रेकफास्ट करा (Eat Healthy Breakfast)

सकाळी भरपेट नाश्ता केल्यास, तुम्हाला दिवसभर योग्य ऊर्जा आणि शक्ती मिळते. तुम्ही रोज योग्य वेळेवर नाश्ता केलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही आणि तुमचं वजनही वाढणार नाही.

साखर खाऊ नका (Avoid Sugar)

वजन वाढण्यासाठी सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे साखर. तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर साखरेपासून दूर राहण्याचाच प्रयत्न करा. सोडा, कॉफी आणि इतर ड्रिंक्समध्ये साखर घालू नका. जास्त गोड चहा अथवा कॉफी पिऊ नका.

बदाम (Almond)

तुम्ही तुमच्या ब्रेकअप स्नॅकच्या स्वरूपात बदाम खात असाल, तर चिप्स आणि कुकीजबरोबर तुम्हाला हे बदलण्याची गरज नाही. आपल्या रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनसॉल्डेट अर्थात मीठ नसलेले बदाम खा. यामुळे तुमची भूक तर नक्कीच शमते.

हिरव्या भाजी (Green Vegetable)

हिरव्या भाज्या जशा ब्रोकोली आणि पालक या फायबरयुक्त असतात. ज्यामध्ये कमी प्रमाणात कॅलरी असते. तुम्हाला तुमच्या हातावरील चरबी कमी करायची असेल तर तुम्हाला अशा भाज्या खाण्याकडे जास्त लक्ष द्यायला हवं.

ग्रीन टी (Green Tea)

रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी नक्की प्या. यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम वाढतं आणि रात्रभर चरबी जाळण्याचं काम शरीरामध्ये सुरु राहातं. ग्रीन टी केवळ जाडेपणा अथवा चरबीसाठीच नाही तर कॅन्सरसारख्या आजारालाही दूर ठेवतं.

भोपळी मिरची (Bhopali Mirchi)

भोपळी मिरचीची भाजी तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्याचं काम करते. या भाजीमध्ये अँटीइन्फ्लेमटरी गुण असतात जे इरिटेबल बाऊल सिंड्रोमचादेखील उपचार करतात. त्यामुळे तुमच्या हातावरील चरबी कमी करण्यासाठी या भाजीचा नक्कीच उपयोग होतो.

सूप (Soup)

सूपाइतका उत्कृष्ट डाएटिंग पर्याय दुसरा कोणताही नाही. तुम्ही तुमच्या जेवणापूर्वी चिकन अथवा कोणत्याही भाजीचं सूप बनवून खाल्लं तर तुमच्या कॅलरीमध्ये घट होण्यासाठी मदत होते.

डार्क चॉकलेट (Dark Chocolate)

डार्क चॉकलेट शरीरातील अधिक चरबी काढून टाकण्यासाठी फायदेशीर आहेत. तसंच डार्क चॉकलेटमुळे मेटाबॉलिजमची प्रक्रिया वेगाने होते. यामुळे तुमची मुख्यत्वे भूक मरते आणि तुमचं पोट भरल्यासारखं वाटत राहातं.

VIEW ALL

Read Next Story