उत्तरं चिंता वाढवणारी

भारतीयांना कोणत्या गोष्टीची सर्वाधिक काळजी? उत्तरं चिंता वाढवणारी

अहवालातून ही बाब समोर

एका अहवालातून ही बाब समोर आली असून काही गोष्टीची चिंता देशातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

बेरोजगारी

निरीक्षणातील अहवालानुसार 52 टक्के भारतीयांना बेरोजगारीची चिंता सतावते. त्याखालोखाल 45 टक्के भारतीय शिक्षणाच्या चिंतेत असतात.

पर्यावरण

39 टक्के भारतीयांना गरीबीची चिंता भेडसावते. 37 टक्के भारतीय पर्यावरणाच्या चिंतेत असतात.

गुन्हेगारी

36 टक्के भारतीयांना आरोग्य आणि सामाजिक सुरक्षेची समस्या सतावते. तर, 35 टक्के भारतीयांना गुन्हेगारीची चिंता भेडसावते.

हवामान बदल

हवामान बदलाची काळजी 34 टक्के भारतीय करतात. तर, धार्मिक तेढ आणि संघर्षाची चिंता 34 टक्के भारतीयांना सतावते.

आर्थिक परिस्थिती...

आर्थिक परिस्थितीच्या काळजीनं 33 टक्के भारतीयांना वेढलं आहे. तर, 33 टक्के भारतीय महागाई आणि 24 टक्के भारतीय दहशतवादाच्या काळजीत आहेत. अन्नपाण्याच्या तुटवड्याची काळजी 30 टक्के भारतीयांना सतावते, नागरी हक्कांसंदर्भातील चिंता 23 टक्के भारतीय करतात. तर, सरकारी कर्जांची काळजी 19 टक्के भारतीय करतात.

VIEW ALL

Read Next Story