दिवाळीला वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला रांगोळी काढावी? इथे पहा

सजावटी ची तयारी

दिवाळी आली की आपण अनेक तयारी करतो आणि हा सण साजरी करण्यासाठी आपण आपल्या घरात वेगवेगळ्या सजावटी करतो.

सुंदर रांगोळी

दिवाळीच्या सणामध्ये आपण दिव्याने आणि रांगोळीने घर सजवतो पण या सर्वांचे महत्त्व खूप असतं तर जाणून घेऊया की रांगोळीने सजावट करताना

रांगोळी कोणत्या दिशेने काढली पाहिजे कोणते रंग वापरले पाहिजे...

रांगोळी काढल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते दूर

सणासुदीला रांगोळी काढल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होतात.

रांगोळीच्या वेगवेगळ्या डिजाइन्स

रांगोळी काढताना आपण वेगवेळ्या डिझाईन आणि रंग वापरून रांगोळी काढतो

रांगोळी काढण्याची योग्य दिशा

घरासमोर रांगोळी काढताना तुम्ही कोणत्या दिशेला रांगोळी काढत आहेत हे खूप महत्त्वाच आहे, कारण ही दिशा आणि रांगोळीचे रंग आपल्या आयुष्यात आनंद, भरभराट आणि सुख आणतात.

पूर्व दिशा

अंडाकृती रांगोळी काढावी आणि यामध्ये लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी, नारंगी या सारख्या रंगांचा वापर केल्यानं घरात सात्त्विक ऊर्जा येते.

उत्तर दिशा

लहरी किंवा पाण्याच्या गुणांशी साम्य असणारे डिझाईनची रांगोळी काढावी. आणि यामध्ये तुम्ही पिवळा, हिरवा, आकाशी आणि निळ्या रंगाचा वापर करू शकता हे घरी शुभ ऊर्जा आणतात.

दक्षिण दिशा

तुम्ही आयताकृती नमुन्यांची रांगोळी काढू शकता आणि यामध्ये तुम्ही गडद लाल, नारंगी गुलाबी आणि जांभळ्या रंगाचा वापर करू शकता.

पश्चिम दिशा :

वर्तुळाकार रांगोळी काढून त्यात तुम्ही सोनेरी आणि पांढर्‍या रंगाचा वापर करू शकता.

VIEW ALL

Read Next Story