उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण करणारे पदार्थ खाण्यावर भर दिला जातो.
या उन्हाळ्यात कैरीचे पन्हे करण्याव्यतिरिक्त तुम्ही कैरी-पुदीन्याचे सरबतही करू शकता
कैरी एक, पुदीना, काळे मीठ, बडिशेप, जीरा पावडर, काळे मीरी, साखर तीन कप
सर्वप्रथम कैरीची साले काढून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात कैरी, पुदीन्याची पाने आणि साखरसोडून सर्व साहित्य घेऊन बारीक वाटून घ्या.
हे मिश्रण वाटताना गरजेपुरते पाणी टाका जेणेकरुन मिश्रण छान एकजीव होईल.
आता एका पॅनमध्ये साखर तीन कप आणि 1.5 कप पाणी घेऊन त्याचा पाक तयार करुन घ्या.
पाक तयार झाल्यानंतर त्यात बारीक वाटून घेतलेले मिश्रण घाला आणि एकजीव करुन घ्या.
आता हे मिश्रण चांगले गाळून घ्या आणि हवाबंद बाटलीत काढून ठेवा. तीन महिन्यापर्यंत हे मिश्रण चांगले टिकते
सरबत करायचे झाल्यास या मिश्रणाचे दोन चमचे एका ग्लासात घेऊन त्यात थंड पाणी आणि बर्फ टाका. कैरी आणि पुदीन्याचे सरबत तयार आहे.