टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा करोडोत कमाई करतो. आता कमाई वाढवण्यासाठी त्याने आणकी एक पाऊल उचललं आहे.

रोहित शर्माने मुंबईतले आपले दोन फ्लॅट भाड्यने दिले आहेत. मुंबईतल्या वांद्रे वेस्ट भागात हे दोन्ही प्लॅट आहेत.

रोहित शर्माने तीन वर्षांच्या करारावर हे फ्लॅट भाड्याने दिले आहेत. यासाठी त्याला प्रत्येक महिन्याला तीन लाख रुपये मिळणार आहेत.

करारानुसार पहिल्या वर्षी 3.1 लाख रुपये मिळतील. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 3.25 लाख आणि तिसऱ्या वर्षी 3.41 लाख रुपये भाडं मिळेल.

मिळालेल्या माहितीनुसार चार जानेवारीला रेंट अॅग्रीमेंट बनवण्यात आलं. 9.3 लाख रुपये इतकं डिपॉझिटनेही त्याने घेतलं आहे.

रोहित शर्मा मुंबईतल्या वरळी परिसरात राहातो. 6000 हजार स्क्वेअर फीटचं त्याचं घर असून त्याची किंमत 30 कोटी रुपये इतकी आहे.

रोहित शर्माचं एक घर लोणावळातही आहे. शिवाय त्याने दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूकही केलीय.

VIEW ALL

Read Next Story