आकाशात अनेकदा अर्धवर्तुळाकार सप्तरंगी पट्ट्याचा इंद्रधनुष्यही तुम्ही पाहिल असेल. यामध्ये सात रंग कसे येतात? किंवा तो अर्धाच का दिसतो? असे प्रश्न आपल्याला पडतात

पण तुम्हाला माहित आहे का अर्धवर्तुळात दिसणारा इंद्रधनुष्य वास्तव्यात पूर्ण वर्तुळाकार असतो.

आकाशातून इंद्रधनुष्याचे चित्तथरारक दृश्य दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

सात रंगांचं पूर्ण वर्तुळ असलेला इंद्रधनुष्याचा फोटो एका फोटोग्राफरने हेलिकॉप्टरमधून अगदी उंचावरुन टिपला आहे.

पूर्ण वर्तुळ असलेला इंद्रधनुष्याचा व्हिडिओ देखील या फोटोग्राफरने @ScienceGuys_ या अकाऊंटवर शेअर केला आहे.

अनेकांनी फोटो पाहून थक्क झाल्याच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. आजपर्यंत सर्वांनी आकाशात अर्धवर्तुळाकर इंद्रधनुष्य पाहिलं आहे.

आकाशातून दिसणारे इंद्रधनुष्य सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. इंद्रधनुष्यातील तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, गडद निळा आणि जांभळा हे रंग या फोटोत स्पष्टपणे दिसतायत.

VIEW ALL

Read Next Story