तरुणपणीच श्रीमंत कसं व्हायचं? 23 व्या वर्षीच करोडपती झालेल्या तरुणाने सांगितलं रहस्य, फक्त 3 गोष्टींचं पालन करा

तरुणपणीच श्रीमंत व्हावं, जेणेकरुन पुढील आयुष्य सुखकर होईल अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यासाठी नेमकं काय करावं हे समजत नाही. दरम्यान, वयाच्या 23 व्या वर्षीच करोडपती झालेल्या तरुणाने श्रीमंतीचा मंत्रा सांगितला आहे. आपलं ध्येय पूर्ण करताना अडथळा येऊ नये यासाठी त्याने नातेवाईकांनाही दूर केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 3, 2023, 11:10 AM IST
तरुणपणीच श्रीमंत कसं व्हायचं? 23 व्या वर्षीच करोडपती झालेल्या तरुणाने सांगितलं रहस्य, फक्त 3 गोष्टींचं पालन करा title=

आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर आपल्याकडेही अमाप पैसा असावा. इतकी श्रीमंती असावी की बसल्या जागी आपल्याला हवी ती गोष्ट मिळेल अशी प्रत्येक सर्वसामान्य तरुणाची इच्छा असते. पण इतका पैसा कमावण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्यात याचं मार्गदर्शन करण्यासाठी कोणी नसतं. मग तरुण नोकरी करत आपली स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. पण आयुष्यभर नोकरी करुनही इच्छा असते तितका पैसा कमावता येत नाही. दरम्यान, वयाच्या 23 व्या वर्षीच करोडपती झालेल्या एका तरुणाने श्रीमंतीचा मंत्रा सांगितला आहे. आयुष्यात यश हवं असेल तर फक्त तीन गोष्टींचं पालन करण्याची गरज त्याने सांगितली आहे. 

पीआर कंपनी हाईकी एजेंसी चालवणारा ल्यूक लिंत्ज वयाच्या 23 व्या वर्षीच करोडपती झाला आहे. त्याने आपल्या यशामागे तीन कारणं असल्याचा उलगडा केला आहे. यामधील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मित्रांपासून अंतर ठेवणं. दुसरं म्हणजे फार काही विचार न करता आपल्या कुटुंबापासूनही दूर राहणं. तसंच तिसरी गोष्ट म्हणजे जगभरात फिरणं. 

ल्यूक लिंत्जचं म्हणणं आहे की, "मी हायस्कूल आणि ग्रॅज्यूएशननंतर फारच प्रसिद्ध झाला होता. मित्र मला त्यांचा वाढदिवस, प्रमोशन आणि लग्नाचं सेलिब्रेशन करण्यासाठी बोलवत असत. पण यामुळे माझं लक्ष भरकटत होतं".

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ल्यूक लिंत्ज आठवड्याचे सातही दिवस काम करतो. तो सांगतो की, "लोकांचे फार मित्र आहेत. पण माझे या वयात कोणीही मित्र नाहीत आणि याची मला अजिबात चिंता नाही". पण लिंत्ज हा आपले दोन्ही भाऊ जॉर्डन आणि जॅक्सन यांच्यासह राहतो. त्यांच्यासोबत मिळूनच तो आपली कंपनी चालवत आहे. पण त्यांच्यातही फक्त काही वेळच चर्चा होते. इतर वेळी ते कामातच व्यग्र असतात. ल्यूक लिंत्ज सांगतो की, "काम केल्यानंतर माझ्याकडे जो वेळ वाचतो, तो मी चर्चेसाठी देतो. मी माझ्या भावांसह कामाची चर्चा करतो. आपण नेमकं कोणत्या दिशेने जात आहोत याबाबत ही चर्चा असते".

नातेवाईकांपासून अंतर

या तिन्ही भावांनी आपल्या नातेवाईकांपासून अंतर ठेवलं आहे. लिंत्ज सांगतो की, "अनेक लोकांकडे आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी गरज असणाऱ्या गोष्टी नाहीत". ल्यूक लिंत्जने आपल्या वयातील अनेक तरुण आळशी असल्याचं म्हटलं असून त्यांच्यावर टीका केली आहे. ल्यूक लिंत्जचं म्हणणं आहे की, मी लोकांमध्ये मिसळणारा आहे आणि लोकांनाही माझ्याबद्दल जाणून घेण्याची फार उत्सुकता असते. पण त्यानंतरही आपण आपल्या ध्येयापासून लक्ष हटकू नये यासाठी सर्व गोष्टींचं पालन करत असतो. काही मैत्री या तुम्हाला आयुष्यात मागे खेचणाऱ्या असतात. ते विनाकारण तुमचा वेळ घालवत असतात. 

ल्यूक लिंत्जची गर्लफ्रेंडदेखील आहे. तो तिला वेळही देतो. जर इच्छा झाली तर आपण मित्रही करु, पण आयुष्यभर राहणारी मैत्री योग्य नसल्याचं तो मानतो. त्याच्या मते यामुळे फक्त वेळ वाया जातो.