सेक्सनंतर भांडण झाल्याने पॉर्नस्टारची हत्या; पोलिसांनी नाही तर चाहत्याने पटवली ओळख

इटालियन पॉर्न स्टारच्या हत्येचा उलगडा तिच्या फॅनमुळे झाला. तिची हत्या केल्यानंतर पीडितेच्या प्रियकराने मृतदेहाचे तुकडे केल्याने मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले होते.

Updated: Mar 30, 2022, 02:06 PM IST
सेक्सनंतर भांडण झाल्याने पॉर्नस्टारची हत्या; पोलिसांनी नाही तर चाहत्याने पटवली ओळख title=
Carol Maltesi

रोम : अनेक महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या पॉर्न स्टारची तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या केली. आरोपीने आधी पीडितेची हातोड्याने हत्या केली आणि नंतर तिच्या शरीराचे तुकडे केले. मारेकऱ्याने शरीराचे अवयव बराच वेळ फ्रिजमध्ये ठेवले, नंतर रस्त्याच्या कडेला फेकून दिले.

ओळख पटली नाही

'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, 26 वर्षीय पॉर्न स्टार कॅरोल माल्टेसीच्या शरीराचे अवयव 19 मार्च रोजी रस्त्याच्या कडेला आढळले. त्यावेळी मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. आरोपींनी मृतदेहाचे तुकडे कचऱ्याच्या पिशवीत टाकले होते. पोलिसांनी खूप प्रयत्न केले, पण खून नक्की कोणी केला हे कळू शकले नाही.

सेक्सनंतर भांडण

मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मृतदेहाचा फोटो प्रसिद्ध केला, ज्यामुळे पीडितेची ओळख पटू शकली. पॉर्न स्टारने पायावर एक टॅटू बनवला गेला होता, जो तिच्या एका चाहत्याने ओळखला. यानंतर पोलिसांनी तपास केला असता मृताच्या प्रियकराचे नाव समोर आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींनी सांगितले की, सेक्स केल्यानंतर त्यांच्यात कशावरून तरी भांडण झाले आणि या रागाच्या भरात कॅरोलला हत्या केली.

जानेवारीपासून बेपत्ता

पोलिसांनी सांगितले की, कॅरोल माल्टेसीचे चित्रपट पाहिलेल्या एका चाहत्याने टॅटू पाहिल्यानंतर तिला ओळखले. तिने पायावर तसेच शरीराच्या अवयवांवर टॅटू बनवला होता. कॅरोल शेवटची जानेवारीमध्ये इटलीतील तिच्या मिलानच्या घरी दिसली होती. तेव्हापासून तिचा थांगपत्ता नव्हता. कॅरलला सहा वर्षांची मुलगीही आहे.

फूड ब्लॉगर बनला किलर

रिपोर्टनुसार, कॅरोलचे तिच्या शेजारच्या फूड ब्लॉगर डेव्हिड फॉंटानासोबत अफेअर होते. मात्र, मृत्यूपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले. हत्येपूर्वी आरोपी आणि पीडितेमध्ये लैंगिक संबंध देखील होते. यानंतर दोघांमध्ये कशावरून तरी भांडण झाले आणि डेव्हिडने कॅरोलला हातोड्याने ठार केले.

मृताच्या आईला पाठवला संदेश 

डेव्हिडने कॅरोलचा चेहरा जाळला होता आणि नंतर तिच्या शरीराचे छोटे तुकडे केले, जेणेकरून पॉर्न स्टारचा मृत्यू झाल्याचे कळू नये. इतकंच नाही तर आरोपी पीडितेच्या आईला आपल्या फोनवरून मेसेजही पाठवत होता, जेणेकरून तिला आपली मुलगी जिवंत असल्याचं वाटलं. मात्र कॅरोलच्या एका चाहत्यामुळे त्याच्या गुन्ह्याचा भांडाफोड झाला.