मेटल डिडेक्टरमध्ये तरुणीच्या शरीरात दिसलं असं काही; एअरपोर्ट कर्मचारी Shocked!

मेटल डिडेक्टरमध्ये तरुणीच्या शरीरात विचित्र वस्तू दिसल्या. शरीरात दिसलेल्या या वस्तू पाहून एअरपोर्टवरचे कर्मचारी शॉक झाले.  

वनिता कांबळे | Updated: May 21, 2024, 05:46 PM IST
मेटल डिडेक्टरमध्ये तरुणीच्या शरीरात दिसलं असं काही; एअरपोर्ट कर्मचारी Shocked! title=

shocking news : सुरक्षेच्या कारणास्तव अति महत्वाची ठिकाणे तसेच प्रामुख्याने विनातळांवर नागरीकांचे कडप कपासणी केली जाते. यासाठी एअरपोर्टवर मेटल डिडेक्टर देखील असतात. मेटल डिटेक्टरमध्ये संपूर्ण शरीर स्कॅन केले जाते. यामुळेच शरीरात गुप्त ठिकाणी लपवून केल्या जाणाऱ्या सोन्याचा तस्करीचे प्रकार अनेकदा   उघडकीस येतात. तायवानमध्ये मात्र, एक अत्यंत विचित्र प्रकार घडला आहे. विमानतळावर  मेटल डिडेक्टरमध्ये तरुणीच्या शरीरात अस काही दिसलं जे पाहून एअरपोर्ट कर्मचारी शॉक झाले.

फँग कियुआन असे या मॉडेलचे नाव आहे. 36 वर्षांची फँग कियुआन ही तायवानची रहिवासी आहे. फँग कियुआन सोशल मिडियावर 'स्प्राइट' नावाने प्रसिद्ध आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 10 लाख म्हणजेच 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. फँग कियुआन ही तायवान विमानतळावरुन प्रवास करत होती. फँग कियुआनने मेटल डिटेक्टरमध्ये प्रवेश करताच कॉम्प्युटर स्क्रीनवर जे दिसले जे पाहून एअरपोर्टवर तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी अचंबित झाले. 

शरीरात दिसले अनेक सर्जिकल स्क्रू 

मेटल डिटेक्टरमध्ये फँग कियुआनच्या शरीरात अनेक सर्जिकल स्क्रू दिसून आले आहे. यापैकी एक स्क्रू हा फँग कियुआनच्या ओठांजवळ दिसला. ओठाच्या अगदी खाली 1 इंचाचा सर्जिकल स्क्रू आढळला आहे. तसेच  फँग कियुआनच्या नाकाजवळही खिळ्यासारखा  सर्जिकल स्क्रू या मेटल डिटेक्टरमध्ये दिसून आला आहे.  आठ वर्षांपूर्वी केलेल्या हनुवटीच्या कृत्रिम अवयवाच्या वेळी हा स्क्रू येथे राहिला असावा असे  फँग कियुआनने सांगितले. 

फँग कियुआन ही एक प्रसिद्ध मॉडेल आहे. सुंदर दिसण्यासाठी फँग कियुआनने अनेक कॉम्सेटिक सर्जरी केल्या आहेत. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, फँगने आतापर्यंत 19 पेक्षा जास्त प्लास्टिक सर्जरी केल्या आहेत. कपाळाच्या 2 शस्त्रक्रिया, पापण्यांच्या 5 शस्त्रक्रिया, नाकाच्या 5 शस्त्रक्रिया, हनुवटीच्या 2 शस्त्रक्रिया आणि पाच वेळा चेहऱ्यावरील दुरुस्तीची शस्त्रक्रिया केली आहे. आतापर्यंत तिने या शस्त्रक्रियांवर अडीच लाख डॉलर्स म्हणजेच दोन कोटी रुपये खर्च केले आहेत.

सोशल मिडिायवर शेअर केले फोटो

मेटल डिटेक्टरमध्ये कॅप्चर झालेले फोटो फँग कियुआनने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यामुळे तिचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. ही सर्व कॉस्मेटिक सर्जीरीची कमाल आहे असं म्हणत चाहत्यांनी तिला ट्रोल केले आहे.