भारतीय विद्यार्थ्याचा मद्यधुंद महिलेवर लैंगिक अत्याचार, घटना CCTV फुटेजमध्ये कैद; VIDEO VIRAL

UK News: ब्रिटनमधून एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय विद्याद्याच्या कृत्याने भारतीयांची मान शरमेने खाली गेली आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jun 18, 2023, 01:44 PM IST
भारतीय विद्यार्थ्याचा मद्यधुंद महिलेवर लैंगिक अत्याचार, घटना CCTV फुटेजमध्ये कैद; VIDEO VIRAL title=
Indian Student Arrested at uk student Sexual assault drunken woman video viral today Trending news

Indian Student Arrested : ब्रिटनमधील एका धक्कादायक घटनेने भारतीयांची मान शरमेने खाली गेली आहे. 20 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याने मद्यधुंद महिलेवर बलात्कार केला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फूट समोर आल्यानंतर त्या नराधमाचा शोध लागला आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रीत विकल असं या नराधमाचं नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

प्रीत विकलने एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या महिलेला उचलून फ्लॅटवर नेत असतानाचा हा व्हिडीओ पाहून पोलिसांनीही धक्का बसला आहे. तुम्ही पाहू शकता काळोख्यात तो नराधम उचलून घेऊन कुठेतरी जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो तिला फ्लॅटवर घेऊन जात होता. पोलिसांनी प्रीतला अटक केली आहे. 

नाईट आऊट नंतर...

पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी जूनमध्ये त्याचासोबत ही भयानक घडना घडली. तिने सांगितलं की, ''ती मित्रांसोबत नाईट आऊटवर असताना तिची प्रीत विकलशी भेट झाली. त्यानंतर ती घरी एकटी जात असताना प्रीतने तिला पकडलं. मी मद्यधुंद अवस्थेत होती. त्यानंतर प्रीतने मला उचलून घेतलं आणि नॉर्थ रोड भागातील एका प्लॅटमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने माझ्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले.''  (Indian Student Arrested at uk student Sexual assault drunken woman video viral today Trending news)

उथ वेल्स पोलिसांनी ट्विटरवर या घटनेची माहिती दिली आहे. Tweet वर Euphorie या घटनेचा cctv फूटेज शेअर करण्यात आला आहे. या सीसीटीव्टी फूटेजमध्ये तो तरुण तिला कार्डिफ सिटी सेंटरमधून घेऊन जाताना दिसत आहे.

या प्रकरणी नराधमाला ब्रिटिश यंग ऑफेंडर्स इन्स्टिट्यूशनने 6 वर्षे आणि 9 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.