Man vs Crocodile: Over Confidence त्याला महागात पडला! मगरीच्या पाठीवर फटका मारला अन्...; पाहा Video

Man Tease Giant Crocodile: सामान्यपणे मगर हा शब्द वाचला, पाहिला किंवा ऐकला तरी अंगावर काटा येतो. मात्र एका व्यक्तीने मगरीची छेड काढण्याचा केलेला प्रयत्न त्याला चांगलाच महागात पडल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Updated: Mar 4, 2023, 02:30 PM IST
Man vs Crocodile: Over Confidence त्याला महागात पडला! मगरीच्या पाठीवर फटका मारला अन्...; पाहा Video title=
Man Tease Giant Crocodile

Video Man Tease Crocodile: मगर हा असा प्राणी आहे ज्या केवळ व्हिडीओमध्ये पाहिलं तरी अंगाचा थरकाप अडतो. म्हणजे खरोखर मगर समोर आली तर काय या विचाराने अंगावर काटा उबा राहतो. अर्थात खरच मगशीरी सामना झाला तर आधी काय करावं हेच सुचणार नाही. मगरीची भीतीच एवढी वाटते की तिला स्पर्श करण्याचा विचारही अनेकांच्या मनाला शिवणार नाही. मात्र एका व्यक्तीने असा शहाणपणा केला. आपल्या आकारापेक्षा अनेकपण ताकदवान आणि शक्तीशाली मगरीला पाहून ही व्यक्ती त्या मगरीच्या पाठीवर थेट हात मारु लागली. अनेकदा या मगरीच्या पाठीवर हात मारल्यानंतर शांत बसलेली मगर मागे वळली आणि त्यानंतर तिने जे काही केलं ते पाहून या व्यक्तीची गाळण उडाली.

हिंमत की बावळटपणा?

आफ्रिका सफारी प्लॅनेट नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरुन अशाप्रकारचे प्राण्यासंदर्भातील धक्कादायक व्हिडीओ अनेकदा शेअर केले जातात. नुकताच असाच एक व्हिडीओ या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये तळ्याकाठी शांत बसलेल्या एका मोठ्या आकाराच्या मगरीला एक व्यक्ती उगाच त्रास देण्यासाठी जातो. सामान्यपणे मगरीसारख्या अवाढव्य आणि हिंसक प्राण्याच्या नादी लागण्याची हिंमत लोक करत नाहीत. मात्र या व्हिडीओमधील व्यक्ती जरा जास्तच आत्मविश्वास दाखवतो. सुरुवातीला ही व्यक्ती या मगरीची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एक असल्याचं वाटतं. मात्र ज्यापद्दतीने ही व्यक्ती मगरीच्या पाठीवर फटके मारते ते पाहून त्याने मगरी जवळ जाण्याचा केलेला हा प्रयत्न हिंमत आहे, ओव्हर कॉन्फिडन्स आहे की बावळटपणा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

मगरीने जबडा उघडून तोंड फिरवलं अन्...

व्हिडीओमध्ये ही मगर एका तळ्याच्या बाजूला उन्हामध्ये निवांत बसलेली दिसत आहे. या मगरीचा आकार फारच मोठा असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. असं असतानाच अचानक एक व्यक्ती हातात काठी घेऊन मगरीच्या बाजूला येतो आणि तिच्या पाठीवर हाताने फटके मारु लागतो. तो या मगरीचा त्रास देत असल्यासारखं थोड्या वेळाने वाटू लागतं. दोन तीन वेळा या व्यक्तीने फटके मारल्यानंतर मगर चांगलीच संतापते. ही मगर या व्यक्तीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने जबडा उघडून मागे वळते. मगरीने दिलेला प्रतिसाद पाहून काळी कळण्याच्या आधीच ही व्यक्ती अडखळून खाली पडते. मात्र नंतर काय झालं हे या व्हिडीओमध्ये दिसत नाही. व्हिडीओमध्ये संपूर्ण घटनाक्रम दाखवण्याआधीच संपतो. 

हा व्हिडीओ पाहून ही व्यक्ती या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी किंवा मगरीची देखभाल करणाऱ्यांपैकी एक असल्याचा अंदाज आहे. या व्हिडीओला लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज असून 50 हजारांहून अधिक लाइक्स आहेत.