Pakistani Viral Girl : व्हायरल पाकिस्तानी गर्लचा नवीन VIDEO आला समोर, सोशल मीडियावर एकच चर्चा

पाकिस्तानच्या लाहोरची रहिवासी असलेल्या आयशाचा (Ayesha) एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता.या व्हिडिओत आयशाने लग्नाच्या कार्यक्रमात लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या "मेरा दिल ये पुकारे" (Mera Dil Ye Pukare Aja) या क्लासिक गाण्यावर नृत्य केले होते. 

Updated: Nov 30, 2022, 10:10 PM IST
Pakistani Viral Girl : व्हायरल पाकिस्तानी गर्लचा नवीन VIDEO आला समोर, सोशल मीडियावर एकच चर्चा  title=

Pakistani Viral Girl : सोशल मीडियावर 'मेरा दिल ये पुकारे...' या बॉलिवूड गाण्यावर डान्स करून चर्चेत आलेल्या पाकिस्तानी गर्लचा (Pakistani Viral Girl) नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओत ती तिच्या मैत्रिणीसोबत डान्स करत आहे.या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  

हे ही वाचा : व्हायरल पाकिस्तानी गर्ल 'त्या' फोटोंमुळे होतेय ट्रोल, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

पाकिस्तानच्या लाहोरची रहिवासी असलेल्या आयशाचा (Ayesha) एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता.या व्हिडिओत आयशाने लग्नाच्या कार्यक्रमात लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या "मेरा दिल ये पुकारे" (Mera Dil Ye Pukare Aja) या क्लासिक गाण्यावर नृत्य केले होते. या तिच्या व्हिडिओवर तिला भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या एका व्हिडिओमुळे आयशाचे सोशल मीडियावर फॅन फॉलोइंगही वाढले होते. आता असाच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.  

हे ही वाचा : तिरंग्याने तोंड पूसलं, गळाही साफ केला, नंतर...संतापजनक VIDEO आला समोर 

 

नवीन व्हिडिओत काय? 

याआधीच्या व्हिडिओमध्ये आयशा (Ayesha) सिंगल डान्स करत होती पण या नवीन व्हिडिओमध्ये ती तिच्या काही मैत्रिणीसोबत ग्रुप डान्स करताना दिसत आहे. यामध्ये ती 'बत्तियां बुझाई' या गाण्यावर डान्स करत आहे. मात्र, यावेळीही ती फक्त स्लो मोशनमध्येच नाचत आहे.

दरम्यान हा त्याच कार्यक्रमाचा व्हिडिओ असावा जिथून पहिला डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता. कारण आयशाने (Ayesha) तेच कपडे घातले आहेत आणि असाच एक कार्यक्रमही पाहायला मिळत आहे. आयशाच्या या नवीन व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे यात आयशाच्या मैत्रिणीही डान्स करताना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saeed Asif (@asif_daddy)

नुकताच हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर (Video Viral) व्हायरल झाला आहे. एका युजरने ही पोस्ट केली आहे. हा व्हिडिओ आधीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओपेक्षा मोठा आहे आणि आयशा तिच्या मैत्रिणींसोबत आनंदाने नाचताना दिसत आहे. दरम्यान आयशाचा हा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर किती धमाका करतो हे पाहावे लागणार आहे.