सूर्य उगवताना व सूर्य मावळताना हिरवा प्रकाश का दिसतो; शास्त्रज्ञांनी सांगितलं कारण!

Green Flash Sunset: सूर्य उगवताना आणि सूर्य मावळताना कधी कधी सूर्याचा रंग हिरवा दिसतो. त्याचे कारण तुम्हाला माहितीये का

मानसी क्षीरसागर | Updated: May 20, 2024, 06:08 PM IST
सूर्य उगवताना व सूर्य मावळताना हिरवा प्रकाश का दिसतो; शास्त्रज्ञांनी सांगितलं कारण! title=
why does green light appear at the time of sunrise and sunset

Green Flash Sunset: सूर्य उगवताना आणि सूर्य माळवताना सूर्याचा रंग कधी नारंगी, लाल तर कधी हिरवा दिसतो. कधी कधी सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयाच्या थोडा आधी तुम्ही आकाशात सूर्याचे हे विविध रंग पाहू शकतात. अशावेळी अनेकांना हा प्रश्न पडतो की सूर्याचा रंग नेमका कोणता आहे. सूर्याला हिरवा रंग का दिसतो? असे प्रश्न तुम्हाला पडतात का? जर हो तर आज याचे उत्तर जाणून घ्याच. शास्त्रज्ञांनी त्याचे कारणही सांगितले आहे. हे कारण आश्चर्यचकित करणारे आहे. 

ग्लासगो विश्वविद्यालयाचे शास्त्रज्ञ जोहान्स कोर्टियल यांनी लाइव्ह सायन्सला दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. खरं तर सूर्याचा रंग हा पांढरा असतो. पण जर तुम्ही प्रिझमच्या माध्यमातून सूर्याकडे पाहिले तर सूर्याची किरणे लाल, नारंगी, पिवळा हिरवा, असल्याचे तुम्हाला जाणवेल. सूर्यप्रकाश जेव्हा वातावरणातील पाण्याच्या थेंबांमधून किंवा काचेतून परावर्तित होतो तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्हलेंथ वेगळे होतात. विज्ञानाच्या भाषेत त्याला रिफ्रेक्शन असं म्हणतात. 

पृथ्वीच्या वायुमंडळात वेगवेगळ्या प्रकारचे गॅस असतात त्यांची वेगवेगळी घनता असते. हे सर्व प्रकाश परवर्तित करतात. त्याच कारणामुळं कधी कधी सूर्याच्या चहूबाजूंनी इंद्रधनुष्याचा रंग दिसतो. रिफ्लेक्शन विशेष करुन तेव्हा होते जेव्हा सूर्य होरायजन म्हणजेच क्षितिजावर आलेला असतो. म्हणजेच जेव्हा सूर्योदय किंवा मग सूर्यास्ताचा वेळ असतो. सूर्याचा प्रकाश एका विशिष्ट्य कोनातून पृथ्वीच्या पृष्णभागातील सर्वात लहान भागात प्रवेश करतो. त्यामुळं आपल्याला हिरव्या रंगाचा सूर्यप्रकाश दिसतो. 

हिरव्या रंगाचा सूर्यप्रकाश का?

हिरव्या रंगाचाच सूर्यप्रकाश का? असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? तर हिरवा रंग हा निळा व पिवळ्या रंगाचा मिश्रण आहे. जेव्हा सूर्य एका विशेष कोनातून सूर्य उगवतो किंवा मावळतो तेव्हा नीळा किंवा पिवळ्या रंगाची वेव्हलेंथ ओव्हरलॅप होते. त्यामुळं हिरवा रंग दिसतो. तुम्ही हा सूर्य कधी पाहू शकता. तर त्यासाठी तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर किंवा उंच डोंगरावर जावे लागेल. कारण किनारी भागातच हे दृश्य पाहू शकता. जेव्हा थंड पाण्यावर गरम हवेची एक लाट असते तेव्हा हवेची ही लाट सूर्याचा प्रकाश रिफ्लेक्ट करण्यास मदत करते.