अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग? प्रकृती गंभीर

Dawood Ibrahim : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. दाऊदची प्रकृती गंभीर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, या बातमीची अद्याप पुष्टी झालेली नाही.

राजीव कासले | Updated: Dec 18, 2023, 06:41 AM IST
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग? प्रकृती गंभीर title=

Dawood Ibrahim : मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तानातील (Pakistan) कराची इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाऊदवर विषप्रयोग करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. कुख्यात डॉन दाऊद (Underworld Don Dawood) गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातील कराचीमध्ये वास्तव्याला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातमीनुसार दाऊदची प्रकृती गंभीर असून त्याच्यार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत दाऊदचा समावेश आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात तो वॉन्टेड आहे.

दरम्यान दाऊद इब्राहिमला कराचीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दाऊदला कोणी विष दिलं, याबाबतही माहिती उपलब्ध झालेली नाही. सोशल मीडियावर दाऊदवर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याची बातमी व्हायरल झाली असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचंही सांगितलं जात आहे. दाऊद इब्राहिमचा जन्म मुंबईत झाला. त्याचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. लहानपणापासूनच दाऊद मारामारी, खंडणी, चोरी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होता. 

दाऊदला का विष दिलं?
दाऊदला विष देण्यामागे तर्क वर्तवले जात आहेत.  भारताविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आहे. याआधी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर अदनान अहमद उर्फ ​​अबू हंजलासह अनेक वॉन्टेड दहशतवादी मारले गेले आहेत. दाऊद इब्राहिम आयएसआयच्या कडेकोट सुरक्षेत असतो. त्याच्यापर्यंत सामान्य माणूसही पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी शक्यताही वर्तवली जातेय.

मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाईंड
डी कंपनीचा प्रमुख असलेला दाऊद इब्राहिम भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात दाऊदचा समावेश होता. या हल्ल्यात 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर हजारो लोकं जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटानंतर भारताने दाऊदला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून घोषित केलं. तेव्हापासून दाऊद पाकिस्तानात लपून बसला आहे. भारताने त्याच्याविरुध्द अनेकवेळा पुरावेदेखील दिले आहेत. पण दाऊद पाकिस्तानात लपला असल्याचं पाकिस्तान कबूल करत नाहीए. 

कोण आहे दाऊद?
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनत दाऊदचं पूर्ण नाव दाऊद इब्राहिम कासकर असं आहे. डिसेंबर 1955 मध्ये महाराष्ट्रतल्या रत्नागिरीमध्ये त्याचा जन्म झाला. त्याचे वडील इब्राहिम कासकर हे महाराष्ट्र पोलिसात कॉन्स्टेबर पदावर कार्यरत होते.  सात भाऊ आणि चार बहिणी असं दाऊदचं कुटुंब आहे. यातल्या सर्वात लहान असलेल्या हुमांयू कासकर याचा 6 वर्षापूर्वा कॅन्सरने मृत्यू झाला. त्याच्यावर पाकिस्तानातच उपचार सुरु होते. 1981 मध्ये दाऊदच्या मोठ्या भावाची पठाण गँगने मुंबईत निर्घृण हत्या केली. याच घटनेनंतर दाऊदची गुन्हेगारी क्षेत्रात एन्ट्री झाली.